राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सन 2020-21

प्रस्तावना -

      महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असुन राज्यात मोठ्या प्रमाणात

फळे व भाजीपाला पिकांचे व्यावसायिक पध्दतीने लागवड करुन उत्पादन घेतले जाते. तसेच त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणत करण्यात येते. मागील 2 ते 3 वर्षापासुन भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतक-यांचा कल वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार किड व रोग मुक्त रोपे तयार करणा-या लहान रोपवाटीका उभारण्यास वाव आहे. याच उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना नव्याने सुरु करण्यात आलेली आहे.सदर योजनेस कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र.-फरोवा-2020/प्र.क्र.97/13-अे दि.9/9/2020

 अन्वये प्रशासकिय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

योजनेचे उद्देश:

      1. भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे.

      2. रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतक-यांना शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे.

      3. पिक रचनेत बदल घडवुन आणणे व नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे.

      4.शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे.

योजनेची व्याप्ती व उद्दिष्ट:

राज्यातील सर्व तालुक्यात रोपवाटीका स्थापन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.सदर योजनेअंतर्गत 500 लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात येत आलेले आहे. प्रत्येक तालुक्यास किमान एक रोपवाटीका उभारण्याचे प्रस्तावित आहे.

लाभार्थी निवड:

1. अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हे. जमिन असणे आवश्यक आहे. (7/12)

      2. रोपवाटीका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.

लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम:

                1. महिला कृषि पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहील.

                2. महिला गट/महिला शेतकरी व्दितीय प्राधान्य राहिल.

                3.भाजीपाला उत्पादक अल्प अत्यअल्प भुधारक शेतकरी शेतकरी गट यांना तृतिय प्राधान्य                            राहील.

योजनेची अमंलबजावणी:

1. अर्ज करणे - सदर योजने अंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांचे Maha DBT या संकेत स्थळावर ऑनलाईन किंवा तालुका कृषि अधिकारी यांचेकडे विहित मुदतीत अर्ज करावेत.

अर्थसहाय्याचे स्वरुप Geo-tagging करणे:

1.  उपविभागीय कृषि अधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प उभारणीनंतर प्रथम मोका तपासणी करण्यात यावी. मोका तपासणीप्रमाणे अनुज्ञेय अनुदानाच्या 60 टक्के अनुदान प्रथम हप्ता (महत्तम रककम रु. 1.38 लाख) लाभार्थाच्या आधारलिंक बँक खात्यावर वितरीत करण्यात येईल. मोका तपासणीवेळी RKVY Bhuvan या पोर्टलवरऍ़पद्वारे रोपवाटीकेचे Geo-tagging करणे बंधनकारक राहिल.

2. रोपवाटीकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री/उचल झाल्यावर मंडळ कृषि अधिकारी यांच्यामार्फम दिृतिय मोका तपासणी करण्यात येईल मोका तपासणीप्रमाणे अनुज्ञेय अनुदानच्या उर्वरित 40 टक्के अनुदान व्दितीय हप्ता (महत्तम रक्कम रु. 0.92 लाख ) लाभार्थाच्या आधारलिंक बँक खात्यावर वितरीत करण्यात येईल.

No comments:

Post a Comment