राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत- मृद आरोग्य पत्रिका योजना प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक कार्यक्रम सन 2020-21


सन 2020-21 मध्ये या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्याला दहा गावांचा लक्षांक देण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यांनी 3510 गावांची निवड केलेली आहे. अशा एकुण 3510 गावांची निवड करून प्रति गाव एक शेतकरी प्रशिक्षण वर्ग व एका प्रात्यक्षिकाचे (जआप आधारीत) आयोजन करण्यात येणार आहे.

योजनेचे महत्वाचे ऊद्देश-

1.रासायनीक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृदा तपासणीवर आधारीत, अन्नद्रव्यांच्या कमतरते नुसार खतांच्या संतुलीत आणि कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देणे.

2.मृदा आरोग्य सुधारण्यासाठी तसेच अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/सल्फर आच्छ्यादीत युरिया सारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणारे खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे.

3.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापना द्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे.

        ही योजना राबविण्याकरिता केंद्र शासनाचा 60 टक्के आणि राज्य शासनाचा 40 टक्के आर्थिक सहयोगाने राबविण्यात येत आहे.

गाव निवडीचे निकष-

 अ. द्वितीय सायकलनुसार अन्नद्रव्य कमतरता असलेली गावे, समस्याग्रस्त जमीनीची गावे.

ब.गतवर्षी माडेल व्हिलेज कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या गावाची पुन्हा निवड करू नये.

क. ज्या गावामध्ये एनआरएलएम (राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका मिशन) अंतर्गत गट/महिला स्वयंसहाय्यतागट, कृषि सखी कार्यरत आहेत अशा गावांनासुध्दा प्राधान्य द्यावे.

ड. रासायनीक खतांचा जास्तीचा वापर, सेंद्रीय कर्बाचे कमी प्रमाण, सूक्ष्म मुलद्रव्यांच्या वापराचा अभाव इ. असलेले गाव.

योजनेतील घटक– या योजनेंतर्गत निवड गावांतील खातेदारांचे माती नमुने गोळा करणे, तपासणे व जमिन आरोग्य पत्रिका वितरण करणे हाघटक केंद्र शासनाने कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे चालु वर्षी स्थगित केलेला असुन फक्त खालील दोन घटक राबविण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

1) सूक्ष्म मूलद्रव्ये व भुसुधारक वापराचे प्रात्यक्षिक-

निवड गावामध्ये या योजनेच्या द्वितीय सायकलच्या आधारावरतयार केलेल्या जमिन सुपिकता निर्देशांकानुसार किंवाजमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशी नुसार 1 हे. चे प्रात्यक्षिक खरीप किंवा रब्बी हंगामामध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये सूक्ष्म मुलद्रव्ये व भुसुधारक (जिप्सम,फोस्फो जिप्सम, बेन्टोनेट सल्फर, जैविक खते, सेंद्रिय खते, चुना, लाइमिंग मटेरीयल इ.) वापराच्या प्रात्यक्षिकासाठी प्रती हेक्टर रु.2500/-इतके अर्थसहाय्य देय आहे. सदर अर्थसहाय्य निवड केलेल्या शेतक-याला डीबीटी पध्दतीने देण्यात येणार आहे.

2) शेतकरी प्रशिक्षण-

या योजनेंतर्गत एका प्रशिक्षण वर्गाचा समावेश असुन त्यासाठी रू. 24000/- इतकी रक्कम देय आहे. यामध्ये प्रात्यक्षिकाच्या आयोजनावेळी विविध विषयांवर गावातील निवडक 30 शेतक-यांचे एक-एक दिवसाचे 2 प्रशिक्षण सत्र पिक वाढीच्या अवस्थेमध्ये खरीप किंवा रब्बी हंगामामध्ये आयोजीत करावयाचे आहे. यामध्ये जमिन आरोग्य पत्रिकेचा वापर व महत्व, सेंद्रिय/जैविक खताचा वापर, एकात्मिक मुलद्रव्य व्यवस्थापन इ. विषयांवर निवड गावातील शेतक-यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी मार्गदर्शक  सुचना 

माती नमुने तपासणी-

शेतकरी यांना माती नमुने तपासणी साठी प्रत्त्येक जिल्ह्यात मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. पुढील प्रमाणे शुल्क भरुन माती नमुने तपासुन देण्यात येतात.  

अ. सर्वसाधारण माती नमुना फी - 35 रु.

    तपासण्यात येणारे घटक- N, P, K, PH,  EC, OC       


ब. विशेष माती नमुना - फी रु. 275/-

तपासण्यात येणारे घटक- N, P,  K,  PH,  EC, Caco3, Na,  Ca,  Mg,  WHC, Soil Structure, Soil Texture etc.    

 

क. सूक्ष्म मुलद्रव्य तपासणी - फी 200 रु.
    
तपासण्यात येणारे घटक-  Fe,  Mn,  Zn,  Cu.

No comments:

Post a Comment