अन्न आणि पोषण सुरक्षा -व्यापारी पिके अंतर्गत कापूस विकास कार्यक्रम- 2024-25

अन्न आणि पोषण सुरक्षा -व्यापारी पिके अंतर्गत कापूस विकास कार्यक्रम- 2024-25

 

              कापूस उत्पादनास चालना मिळावी या उद्देशाने अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत कापूस विकास कार्यक्रम राज्यातील धुळे, जळगाव, अहमदनगर, छ.संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपुर, चंद्रपुर या प्रमुख 16 कापूस उत्पादक जिल्हयात राबविण्यात येत आहे.

 

राबविण्यात येणारे घटक-

  1. एकात्मिक पिक व्यवस्थापन (ICM) आद्यरेषीय प्रात्यक्षिके
  2. आंतरपीक पद्धतीची आद्यरेषीय प्रात्यक्षिके
  3. कापसाच्या सरळ वाणांच्या अतीघन लागवडीच्या चाचण्या (HDPS)
  4. पिक संरक्षण औषधे व बायो एजंटसचे वितरण
  5. देशी आणि अती लांब धाग्याच्या कापसाचे बिजोत्पादन आद्यरेषिय प्रात्यक्षिके
  6. राज्यस्तरीय प्रशिक्षण (अधिकारी व कर्मचारी)
  7. ऑनलाईन पेस्ट मॉनिटरिंग ॲण्ड ॲडव्हायझरी सर्व्हिसेस (ओपीएमएएस)
  8. कापूस पिकाचे फरदड निर्मुलन प्रात्यक्षिके

 

पिक प्रात्यक्षिके-

  • पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रसाराचे साधन म्हणून पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन शेतकरी यांच्या शेतावर करण्यात येते.
  • यासाठी गावातील शक्यतो सलग 10 हेक्टर चे क्षेत्र निवडण्यात येते. या 10 हेक्टर क्षेत्रातील शेतकरी यांचा समूह/गट करण्यात येतो.
  • या 10 हेक्टर क्षेत्रात किमान 10 शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • प्रती शेतकरी किमान 0.40 हेक्टर व जास्तीत जास्त 1 हेक्टर क्षेत्र मर्यादेत लाभ देण्यात येतो.
  • पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत घेण्यात येणारे शेतकरी शेतीशाळा संलग्न प्लॉट वर सदर प्रात्यक्षिके घेण्यात येतात.
  • सुधारित तंत्रज्ञानाचा वापर (सुधारित बियाणे, खते, औषधे इ .) या प्रात्यक्षिक क्षेत्रात करण्यात येतो. प्रात्यक्षिक प्लॉट शेजारीच पारंपारिक पद्धतीवर आधारित तुलनात्मक प्लॉट घेण्यात येतो.

घटक

1)    एकात्मिक पिक व्यवस्थापन (ICM) आद्यरेषीय प्रात्यक्षिके -

यासाठी प्रती हेक्टर रु.8000 इतके अर्थसहाय्य आहे. यामध्ये रु.7000 निविष्ठां साठी व रु.1000 आकस्मिक खर्चासाठी आहे.

2)    आंतर पीक पद्धतीची आद्य रेषीय प्रात्यक्षिके (कापूस पिकात मूग,उडिद)

यासाठी प्रती हेक्टर रु.8000 इतके अर्थसहाय्य आहे. यामध्ये रु.7000 निविष्ठांसाठी व रु.1000 आकस्मिक खर्चासाठी आहे.

3)    कापसाच्या सरळ वाणांच्या अतीघन लागवडीच्या चाचण्या (HDPS)-

पावसाची अनियमितता, पावसातील खंड, हलक्या व उथळ जमिनीत कापूस लागवड या पार्श्वभूमी वर कापसाच्या अतीघन लागवडीची पद्धत अधिक उपयुक्त ठरत आहे. रु.10000 प्रती हेक्टर इतके अर्थसहाय्य असुन त्यापैकी रु.1000 हे आकस्मिक खर्चासाठी उपलब्ध आहे.

 

4)    पिक संरक्षण औषधी व बायो एजंटसचे वितरण-

ही बाब बीटी व नॉन बीटी दोन्ही प्रकारच्या कापुस पिकाला लागू आहे.

यामध्ये बीज प्रक्रिया, पिक संरक्षण औषधे, कामगंध सापळे इ साठी खर्चाच्या 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर इतके अर्थसहाय्य देय आहे. याबाबतची कार्यवाही क्रॉपसॅपच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात येते.

 

5)    देशी आणि अती लांब धाग्याच्या कापसाचे बिजोत्पादन आद्यरेषिय प्रात्यक्षिके -

यासाठी प्रती हेक्टर रु.9000 इतके अर्थसहाय्य आहे. यामध्ये रु.8000 निविष्ठांसाठी व रु.1000 आकस्मिक खर्चासाठी आहे.

 

6)    कापूस पिकाचे फरदड निर्मुलन प्रात्यक्षिके-

यासाठी प्रती हेक्टर रु.5000 इतके अर्थसहाय्य आहे. 
=========================================

“कृषी योजनांचा अधिक माहिती साठी”
खालील कृषी विभागाची Whats App चॅनल, युट्युब चॅनल, टेलिग्राम चॅनल, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, ट्विटर खाते, like and Follow or Subscribe करा.
🎯कृषी विभाग वेबसाईट : https://krishi.maharashtra.gov.in
🎯कृषी विभाग युट्युब चॅनल : https://youtube.com/@AgricultureDepartmentGoM
🎯कृषी विभाग Whats App चॅनल: https://whatsapp.com/channel/0029Va9TaWN8fewi8s27o53T
🎯कृषी विभाग टेलिग्राम चॅनल: https://t.me/AgricultureDepartmentGoM
🎯कृषी विभाग इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/agricutlure_gom/
🎯कृषी विभाग फेसबुक पेज: https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM
🎯कृषी विभाग ट्विटर खाते: https://twitter.com/AgriDeptGoM



No comments:

Post a Comment