मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना- मागेल त्याला शेततळे

 मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना- मागेल त्याला शेततळे


* राज्यातील ८२ टक्के शेती कोरडवाहू असून ती पावसावर अवलंबून आहे.


* पावसाचे असमान वितरण आणि पावसामध्ये वेळोवेळी येणारे खंड यामुळे पाण्याचा ताण पडल्याने पिक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. काही वेळा पिके देखील नष्ट होतात.


* या बाबींचा विचार करून शासन निर्णय दि. २९ जून २०२२ अन्वये, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे.


* सदर योजना राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे, नक्षलग्रस्त जिल्हे तसेच राज्यातील इतर सर्वसाधारण क्षेत्रात राबविण्यात येते. वैयक्तिक शेततळ्यास    किमान रुपये १४४३३ तर कमाल रुपये ७५०००/- इतके अनुदान देण्यात येते.


* योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी शेतक-याकडे त्याच्या नावावर कमीत कमी ०.४० हेक्टर जमीन असावी. तर कोकण विभागासाठी क्षेत्राची अट ०.२० हेक्टर इतकी आहे. मात्र कमाल क्षेत्र धारणेची मर्यादा नाही.


* महा डीबीटी प्रणाली अंतर्गत शेतक-यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.


* या योजनेंतर्गत शेततळे या घटकाची महा डीबीटी प्रणालीव्दारे लाभार्थी अर्जाची निवड करुन योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.


* शेततळे पूर्ण झाल्यानंतर योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेले अनुदान संबंधीत शेतक-यांच्या आधार क्रमांकाशी सलग्न बँक खात्यावर पीएफएमएस प्रणालीव्दारे वर्ग करण्यात येते.


* शासन परिपत्रक दि. २५ एप्रिल २०२३ अन्वये, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे बाबीच्या अंमलबजावणीस मान्यता.


* सन २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये ३८१६ शेततळे पुर्ण झाली असून लाभार्थीचे बँक खात्यावर रक्कम रु. २४९६.९३ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment