18. विविध कृषि पुरस्कार (100% राज्य योजना)
योजनेचा उद्देश - राज्यात दरवर्षी शेती व सलंग्न क्षेत्रात अतिउल्लेखनीय कार्य करणा-या शेतक-यांना अथवा संस्थेस
महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालील पुरस्कार दिले जातात.
१.
डॉ.पंजाबराव
देशमुख कृषिरत्न पुरस्कार- (संख्या-१)
Ø कृषी क्षेत्रातील कृषि विस्तार, कृषि
प्रक्रीया, निर्यात, कृषि
उत्पादन, पीक फेरबदल, कृषि
उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मध्ये अति उल्लेखनिय कार्य करणा-या
राज्यातील कोणत्याही एका शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत
सन्मानित करण्यात येते.
Ø रु. 300000/- रोख रकमेचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
२. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार- (संख्या -०८)
Ø कृषि, पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय
विकास व मत्स्यव्यवसाय विकास व फलोत्पादन, ग्रामिणविकास, ज्यामध्ये
बायोगॅसचा वापर, शेतक-यांचा विकास इत्यादी संलग्नक्षेत्रात अव्दितीय
कार्य करणा-यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत दरवर्षी एकुण (०८ ) शेतकरी अथवा संस्थाना कृषिभुषण पुरस्काराने
सन्मानित करण्यात येते.
Ø रु.200000/- रोख रक्कम ,स्मृतिचिन्ह
सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
३.
जिजामाता
कृषिभूषण पुरस्कार- (संख्या -08)
Ø राज्यातील शेतीक्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती
व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असुन, शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय
आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेतीविकासाच्या दृष्टीने ही अतिशय
महत्वाची बाब, तसेच शेतीक्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात
घेऊन त्यांच्याकार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन
इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत
पुरस्काराची सुरुवात केली आहे.
Ø रु.200000/- रोख रक्कम,स्मृतिचिन्ह
सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार,
४.
कृषिभूषण (सेंद्रिय शेती)
पुरस्कार- (संख्या-8)
Ø
सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यात
प्रोत्साहन देऊन शेती करणाऱ्या तसेच उत्पादीत सेंद्रीय मालाची विक्री व्यवस्था करणे या
मुख्य हेतुने राज्यातील जे शेतकरी या संकल्पनेचा अवलंब करत आहेत. अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
Ø 200000/- रोख रक्कम,स्मृतिचिन्ह
सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार,
५.
वसंतराव
नाईक शेतीमित्र पुरस्कार- (संख्या 08)
Ø जे जाणते शेतकरी त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या
परिसरातील इतर शेतक-यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन
किंवा प्रोत्साहित करतील,
तसेच इतर व्यक्ती /संस्था
ज्या स्वत: शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वत:ची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे
किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतक-यांना / व्यक्तींना / संस्थांना, त्याचप्रमाणे
कृषि क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग (उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम
उद्योग, गांडुळशेती इत्यादीमधील) वैशिष्टपुर्ण
कामगिरी करणा-या व्यक्ती तसेच खेडयांमधुन परसबाग वृध्दींगत करणा-या महिला, कृषि
विकास मंडळ ज्या गावात सक्रिय आहे. अशा शेतक-यांना सन्मानित करण्यात येते.
Ø रु.120000/- रोख रक्कम,स्मृतिचिन्ह,
सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
६.
उद्यान पंडित पुरस्कार- (संख्या-८)
Ø महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, जमिनीची
प्रत व हवामानातील विविधता यामुळे फलोत्पादनास मोठा वाव आहे. भाजीपाला पिके, फळ
पिके, फुल पिके, मसाला
पिके, औषधी व सुंगधी वनस्पती पिके यापासून शेतक-यांना
मोठया प्रमाणात लाभ होत आहे. तसेच राज्यात फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी
करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांने शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.
Ø रु १००००० /- रोख रक्कम,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
७.
वसंतराव
नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार- (संख्या-40)
Ø शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारीत शेती
औजरांचा वापर, जमिनीच्या प्रतवारी प्रमाणे पिकांची लागवड, जमिनीचे
सपाटीकरण, कंटुर पध्दतीने पेरणी, रासायनिक
खतांचा सुयोग्य वापर, विहीर / नाला इत्यादी मधील पाणी
अडवुन शेतीतील नालाबडींग इत्यादीव्दारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पध्दतीव्दारे पाण्याचा
सुयोग्य वापर, पिक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी, शेती
पुरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड, इत्यादींची
लागवड करणे, स्वत:च्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड, शेतक-यांना
शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, राज्य
शासनाच्या कृषि विभागाकडून आदिवासी गटासह एकुण 40 (चाळीस)
शेतक-यांना सन्मानित करण्यात येते.
Ø
रु.४४०००/-
रोख रक्कम, पारितोषिक,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
८.
युवा
शेतकरी पुरस्कार- (संख्या-०८)
Ø वय वर्ष १८ ते ४०
Ø रु.120000/- रोख रक्कम,
पारितोषिक,स्मृतिचिन्ह,
सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार
No comments:
Post a Comment