डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन

प्रस्तावना:

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना दि.१६/१०/२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये झाली आहे. मिशनची संस्था नोंदणी अधिनियम1860  अंतर्गत स्थापना करण्यात आली आहे. मिशन प्रथम टप्प्यात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या ६ जिल्हयात राबविण्यात येत आहे. सदर ६ जिल्ह्यामध्ये एकुण ५०० उत्पादक गट स्थापित करावयाचे  आहेत.

योजनेचा मुख्य उद्देश:

जैविक/सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करताना शेतकरी समूह गट स्थापित करुन स्वनिर्मित निविष्ठांचा उपयोग करून उत्पादित शेतमालाचे सेंद्रिय प्रमाणीकरण, प्राथमिक प्रक्रिया, बाजारपेठ शृंखला इत्यादीतून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करुन तीन वर्षात उत्पन्नात वाढ करणे.

योजनेचे स्वरुप:

योजना 50 एकर क्षेत्राचा 20-२५ शेतकऱ्यांचा लाभार्थी गट तयार करुन राबविण्यात येत आहे. प्रति शेतकरी १ हेक्टर कमाल लाभ मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. असे १५ ते २० किलोमीटर परिघात १० गट स्थापन करून त्यांचा एक क्लस्टर तयार होतो. सदर क्लस्टरसाठी समुह संकलन केंद्र (Cluster Aggregation Center - CAC) स्थापन करण्यात येईल. हे केंद्र गटांसाठी मार्गदर्शन केंद्र व उत्पादित मालाचे खरेदी- विक्री केंद्र म्हणून कार्य करेल. या केंद्रावर शेतमालाची प्राथमिक प्रक्रीया व साठवणुक करण्यात येईल.

सीएसी स्तरावर एक शेतकरी उत्पादक संस्था (FPO) स्थापन करण्यात येईल. गटातील सर्व शेतकरी (FPO) चे भागधारक सभासद असतील. शेतकऱ्यांकडील क्षेत्रानुसार भागभांडवल जमा करण्यात येईल. जमा झालेल्या एकूण भागभांडवला पैकी किमान रु. ५.00 लाख FPO चे भागभांडवल असेल व त्यास मिशनच्या माध्यमातून रु. १३.00 लाख अनुदान MACP च्या धर्तीवर टप्प्याटप्प्याने दिले जाईल. अशा प्रकारे रु. १८.00  लाख हे समूह संकलन केंद्र यासाठी  प्रकल्पमूल्य असेल.

एकूण ५० स्थानिक किरकोळ विक्री केंद्र मिशनच्या माध्यमातून स्थापित करण्यात येतील. त्यासाठी रक्कम रु. ५.00 लाख प्रति विक्री केंद्रासाठी अनुदान देय राहील व त्यापेक्षा जास्त येणारा खर्च (FPO) करेल.

याप्रमाणे मिशनमध्ये ५० क्लस्टर तयार होणार आहेत. सदर ५० क्लस्टरचा एक जैविक महासंघ स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये अंदाजे 10 ते 12 हजार शेतकरी कुटूंबांचा समावेश करण्यात येणार आहे. योजने अंतर्गत प्रथम वर्षी निवड केलेल्या गटाला सलग तीन वर्षापर्यंत लाभ द्यावयाचा आहे. मिशन मधील जैविक सेंद्रिय प्रमाणित मालासाठी एकच ब्रँड तयार करण्यात येत आहे.

कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती विषयक विविध घटकांवर संशोधन करण्यात येणार आहे.

 

सेंद्रीय निविष्ठा निर्मिती /वापर व अनुदान: 

शासन निर्णयातील बाब क्र. ६.३.१ अंतर्गत नमुद केलेली बाब क्र.१ ही राबवीणे बंधनकारक असून उर्वरित बाब क्र. २ ते १० वरील उपाययोजनांपैकी गरजेनुरूप उपाययोजना शेतावर राबवावयाच्या आहेत. राबविलेल्या उपाययोजनां करीता देय अनुदान प्रति एकर                            रू. ५५००/- पर्यंत मर्यादेत राहील. अनुदाना करीता प्रति शेतकरी अधिकतम क्षेत्र मर्यादा २.५ एकर पर्यंत राहील. यानुसार एका गटाकरिता अधिकतम क्षेत्र ५० एकर पर्यंत मर्यादित राहील. सदरचे अनुदान शेतकरी गटाच्या बँक खात्यात डि.बी.टी. पध्दतीने वर्ग करण्यात येईल. उपरोक्त बाबींकरिता ठरलेल्या मापदंडा पेक्षा जास्त असलेली रक्कम ही शेतकऱ्याने स्वत: खर्च करायची आहे.


अनु. क्र.

तपशील

खर्चाचे  मापदंड

सेंद्रिय शेती रुपांतरणासाठी करावयाच्या उपाययोजना ( मृद नमुने तपासणी,  जैविक  कुंपण, चर अथवा शेताच्या कडेने बंधारा घालणे)

रू. १०००/-

सेंद्रिय बियाणे संकलन अथवा सेंद्रिय पध्दतीने रोप निर्मिती करणे

रू. 5००/-

हिरवळीच्या खतांची पिक लागवड करणे. हिरवळीच्या खताच्या पिकाच्या नुसार विद्यापीठाने केलेल्या  शिफारशिनुसार बियाणे वापरावे

रू. १०००/-

विविध कंपोस्ट पध्दतीचा अवलंब करुन सेंद्रिय घटक कुजवून खत निर्मिती करणे. उदा. नाडेप, बायोडायनॅमिक कंपोस्ट, व्हर्मिकंपोस्ट इ.

रू. १०००/-

कंपोस्ट ची गुणवत्ता वाढविण्यासाठी जीवाणु खते जसे  Azotobacter, Azosprilium PSB, KMB तसेच Trichoderma या सारखे जैविक बुरशीनशके, तसेच कंपोस्ट मध्ये स्फुरदाचे प्रमाण वाढविण्यासाठी  Rock Phosphate या खनिजाचा वापर या घटका अंतर्गत करता येईल

रू. १०००/-

बीज प्रक्रिया (जैविक खते उदा. रायझोबीयम ; स्फुरद विरघळणारे जिवाणु ; पोटेश मोबीलायझींग बॅक्टेरीया, अॅझोटोबॅक्टरचा इ. तसेच Trichoderma सारख्या जैविक बुरशी नाशके व बीजामृत किंवा CPP च्या बिज प्रक्रिये करिता उपयोग करावा. बीज प्रक्रियेसाठी आवश्यक जीवाणु खते व जैविक बुरशी नाशके यांची खरेदी  प्राधान्यक्रमाने कृषि विद्यापिठ, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग प्रयोगशाळा व NPOP मान्यता प्राप्त उत्पादक कंपनी  यांचे कडुन करावी)

रू. 5००/-

जमिनिमध्ये सुक्ष्म जीवजंतुचे प्रमाण वाढविण्यासाठी स्थानिकरित्या विविध कल्चर, निर्मिती व वापर उदा. जिवामृत, अमृतपाणी, सीपीपी, बायोडायनॅमिक, BD preparations इत्यादी साठी लागणारे आवश्यक साहित्य वापरून शेतावरच तयार करावे.

रू. १5००/-

पिक संरक्षणासाठी करावयाच्या उपायोजना

रू. १०००/-

जैविक किड व बुरशीनाशकांचा वापर

रू. १०००/-

१०

स्थानिक परिस्थितीनूसार आवश्यक निविष्ठा निर्मिती/ वापर- पिक संरक्षणासाठी कामगंध सापळे, पिवळे / नीळे चिकट सापळे, प्रकाश सापळे, फळ माशी साठीचे सापळे, पक्षीथांबे इत्यादिचा वापर करावा.

रू. 5००/-

No comments:

Post a Comment