एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान क्षेत्र विस्तार

उद्देश :-

1)  क्षेत्रविस्तार घटकामध्ये विविध फळपिकांच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर करून उत्पादकतेमध्ये वाढ करणे.

2)  लागवड साहित्याचा वापर मानांकित रोपवाटीकेमधूनच करणे.

3)  पिक समूह आधारीतच फळपिके/ फुलपिके/ मसाला पिके, लागवड पिके, सुगंधी वनस्पती यांची लागवड करणे .

4)  आतापर्यंत झालेल्या लागवडीचा विचार करून फळपिक निहाय समूह स्थापन करणे.

5)  या समूहाच्या सर्वंकष विकासासाठी सद्यस्थिती वाव (Missing Links) यांचा विचार करून उत्पादन ते बाजारपेठ (End to End approach) प्रकल्प आराखडे तयार करणे.

6)  उपलब्ध साधन सामुग्री विचारात घेऊन समूह आधारित विकास आराखडा तयार करणे त्याची अमंलबजावणी करणे.

 अर्ज करण्याची  पध्दती -

   इच्छुक शेतकऱ्याने https//hortnet.gov.in/mahaDBT  या संकेतस्ळावर ऑनलाईन नोंदणी अर्ज करावा.

 

आवश्यक कागदपत्रे -

       7/12, 8- चा नमुना, आधार कार्ड, आधार संलग्न राष्ट्रीयकत बँक खाते पास बुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, विहीत नमुन्यातील (अनुसुचित जाती अनुसुचित जमाती शेतकऱ्यासाठी), ऑनलाईन नोंदणी करतानाच ही  कागदपत्रे अपलोड करावीत.

1.  जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन

2.  पुष्पोत्पादन विकास कार्यक्रम

3.  मसाला पिके विकास कार्यक्रम

4.  गुणवत्तापुर्ण लागवड साहित्य निर्मिती -

 . उच्च तंत्रज्ञान आधारित रोपवाटिकांची स्थापना करणे (सार्वजनिक क्षेत्रासाठी)

 . नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे

 . उती संवर्धन प्रयोगशाळांचे बळकटीकरण/पुनरुज्जीवन

5.  परपरागीकरणासाठी मधुमक्षिकापालन -

6.  मनुष्यबळ विकास कार्यक्रम (शेतकरी प्रशिक्षण प्रक्षेत्र भेट)

7.  अळिंबी (मशरुम) उत्पादन प्रकल्प-

·            1. अळिंबी उत्पादन प्रकल्प

·            2. अळिंबी बीज उत्पादन केंद्र (Spawn Making Unit) -

·            3. बटन अळिंबी उत्पादनासाठी कंपोस्ट प्रकल्प (Compost Making Unit) -


 

अंमलबजावणीची कार्यपध्दती :-

·       संकेतस्थळावर अर्ज करणे

·       जेष्ठता सुची तयार करणे

·       सविस्तर अर्ज करणे

·       मान्यता पुर्व स्थळपाहणी

·       कर्ज मंजुरी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे

·       प्रकल्पाचे छाननी शिफारस करणे

·       जिल्हा अभियान समितीची प्रशासकीय मंजुरी

·       संयुक्त तपासणी पथकामार्फत तपासणी करणे

·       अनुदान वितरण करणे

 

बहुवाषिर्क फळपिक लागवड-

आंबा पेरु घन लागवड पध्दती (High Density Planting)-

आंबा घनलागवड ठिबक सिंचन सहित-

आंबा पिकाच्या घनलागवडीसाठी परिशिष्ट- 3 मध्ये नमुद केल्याप्रमाणे (3.00 मी. X 6.00 मी.),  ठिबक सिंचन सहित रू. 90,875/- एकूण मापदंडाच्या 40 टक्के रू. 36,350/- प्रती हेक्टर अनुदान देय राहील. या प्रमाणे पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या वर्षात अनुक्रमे 60:20:20 टक्के अनुदान देण्यात यावे.

                      आंबा - ठिबक सिंचन सहित (3.00 मी. X 6.00 मी.)                                                                        

                                                                       (रु. प्रति हे.)

तपशील

लागवड वर्ष पहिले

लागवड वर्ष दुसरे

लागवड वर्ष तिसरे

एकूण

आर्थिक

आर्थिक

आर्थिक

आर्थिक

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत आंबा पिकासाठी एकूण मापदंड

90,875

मापदंडाप्रमाणे द्यावयाचे अनुदान - खर्चाच्या 40 टक्के याप्रमाणे 3 वर्षात द्यावयाचे अनुदान

21,810

7,270

7,270

36,350

 

 आंबा घनलागवड ठिबक सिंचन विरहीत -

 

1.  आंबा पिकाच्या घनलागवडीसाठी परिशिष्ठ u 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे (3.00 मीx 3.00 मी), ठिबक सिंचन विरहीत रु.56,975/- एकूण मापदंडाच्या 40 टक्के रु.22,790/- प्रति हेक्टर अनुदान देय राहील. या प्रमाणे पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या वर्षात अनुक्रमे 60:20:20: टक्के अनुदान देण्यात यावे.

 

2.  पेरु घनलागवड ठिबक सिंचन सहित-

3.  पेरु पिकाच्या घनलागवडीसाठी परिशिष्ठ u 3 नमुद केल्याप्रमाणे (3.00 मी x 3.00 मी.), ठिबक सिंचन सहित रु.1,31,730/- एकूण मापदंडाच्या 40 टक्के रु.52,692/- प्रती हेक्टर अनुदान देय राहील. याप्रमाणे पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या वर्षात अनुक्रमे 60:20:20: टक्के अनुदान देण्यात यावे.

पेरु ठिबक सिंचन सहित (3.00 मी x 3.00 मी.)

 

                                                                     (रु. प्रति हे.)

तपशिल

लागवड

 वर्ष पहिले

लागवड वर्ष दुसरे

लागवड वर्ष तिसरे

एकूण

आर्थिक

आर्थिक

आर्थिक

आर्थिक

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पेरू पिकासाठी एकूण मापदंड

1,31,730

मापदंडाप्रमाणे द्यावयाचे अनुदान - खर्चाच्या 40 टक्के याप्रमाणे 3 वर्षात द्यावयाचे अनुदान

31,615

10,538

10,538

52,692

 

 

 

         पेरू घनलागवड ठिबक सिंचन विरहीत-

       पेरु पिकाच्या घनलागवडीसाठी परिशिष्ट- 3 मध्ये नमुद केल्याप्रमाणे (3.00 मी. X 3.00 मी.), ठिबक सिंचन विरहीत रू. 73,330/- एकूण मापदंडाच्या 40 टक्के रू. 29,332 /- प्रति हेक्टर अनुदान देय राहील. या प्रमाणे पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या वर्षात अनुक्रमे 60:20:20 टक्के अनुदान देण्यात यावे.

 

                      ठिबक सिंचन विरहित (3.00 मी X 3.00 मी)

                                                                     (रु. प्रति हे.)

तपशिल

लागवड वर्ष पहिले

लागवड वर्ष दुसरे

लागवड वर्ष तिसरे

एकूण

आर्थिक

आर्थिक

आर्थिक

आर्थिक

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पेरू पिकासाठी एकूण मापदंड

73,330

मापदंडाप्रमाणे द्यावयाचे अनुदान - खर्चाच्या 40 टक्के याप्रमाणे 3 वर्षात द्यावयाचे अनुदान

17,599

5,866

5,866

29,332

 

स्ट्रॉबेरी लागवड-

स्ट्रॉबेरी लागवड ठिबक सिंचन मल्चिंग सहित-

स्ट्रॉबेरी पिकाच्या (0.50 मी. X 1.0 मी.) अंतराच्या लागवडीस लागवड साहित्यासाठी  रु. 10,000/- प्रती हेक्टर निविष्ठासाठी (एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक किड व्यवस्थापन)  रु. 1,00,000/- प्रती हेक्टर तसेच ठिबक सिंचन सहित एकात्मिक पॅकेज मल्चिंगसाठी रु. 1,00,000/- असे एकूण रु. 2,10,000/- प्रती हेक्टर मापदंडाच्या 40 टक्के रक्कम रु. 84,000/- प्रती हेक्टर अनुदान देय राहिल.

स्ट्रॉबेरी- ठिबक सिंचन व मल्चिंग सहित (0.50 मी. X 1.0 मी.)                                                                                                                                            

                                                             (रु. प्रति हे.)

तपशील

एकूण मंजूर मापदंड व देय अनुदान

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत स्ट्रॉबेरी पिकासाठी एकूण मापदंड

2,10,000

एकूण मापदंडाप्रमाणे द्यावयाचे अनुदान खर्चाच्या 40 टक्के याप्रमाणे द्यावयाचे अनुदान

84,000

 

 

 स्ट्रॉबेरी लागवड ठिबक सिंचन विरहीत- 

स्ट्रॉबेरी पिकाच्या ठिबक सिंचन विरहीत एकात्मिक पॅकेज लागवडीसाठी रक्कम रू. 1,10,000/- प्रति हेक्टर मापदंडाच्या 40 टक्के रू. 44,000/- प्रति हेक्टर अनुदान देय राहिल.

स्ट्रॉबेरी -ठिबक सिंचन विरहीत (0.50 मी. X 1.0 मी.)                     

                                                   (रु. प्रति हे.)

तपशील

एकूण मंजूर मापदंड व देय अनुदान

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत स्ट्रॉबेरी पिकासाठी एकूण मापदंड

1,10,000

एकूण मापदंडाप्रमाणे द्यावयाचे अनुदान खर्चाच्या 40 टक्के याप्रमाणे द्यावयाचे अनुदान

44,000

 

मापदंड - लागवडीच्या अंतरानुसार प्रति हे.निश्चित केलेले आहे.

 

क्षेत्रविस्तार कार्यक्रम राबविण्याबाबत कार्यपध्दती -

1. लाभार्थीची निवड करताना ज्यांचे क्षेत्र सध्या अस्तित्त्वात असलेल्या पिकसमुहाच्या क्षेत्रामध्ये आहे अशा लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.

2. दुसऱ्या तिसऱ्या वषीर् जे लाभाथीर् कमीत कमी प्रत्येकी अनुक्रमे 75 टक्के 90 टक्के झाडे जिवंत ठेवतील ते लाभाथीर् अनुदान देण्यास पात्र ठरतील.

3.  क्षेत्रविस्तार घटकांतर्गत लागवड साहित्य,एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन व ठिबक सिंचन या बाबीकरीता अनुदान देय राहील. (रोजगार हमी प्रमाणे )

4.  लागवडीकरिता लागणारी कलमे/ रोपे मानांकीत असलेल्या शासकिय फळरोपवाटिका, कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र यासारख्या खात्रीच्या स्त्रोतामधून लाभार्थींने खरेदी करावी..

5.  अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारीत जातीची निवड करावी.

6.  अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारीत जातीची निवड करावी.

7. समूह पध्दतीने शेतक-यांचे स्वयंसहाय्यता गट तयार करुन त्यांना प्रकल्प आधारीत कार्यक्रमाचा लाभ देणे.

 

अनुदान वितरण -

 

        जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे स्तरावरून देय अनुदान पीएफएमएस द्वारे थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. अधिक माहितीसाठी सविस्तर मार्गदशक सुचना www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावरील योजना/मार्गदर्शक सुचना/ फ़लोत्पादन विभागांतर्गत उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment