राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य व तेलताड) सन २०२4-२५
अभियानाचा
उद्देश : गळीतधान्य पीकांखालील क्षेत्र
वृध्दी व उत्पादकतेत वाढ करणे.
अभियान क्र-1: गळीतधान्य अभियान: समाविष्ठ पिके (सोयाबीन, करडई, जवस, तीळ,भुईमुग,मोहरी,सुर्यफुल )
v
लाभार्थी निवडीचे निकष:
1)
सदर पीक घेणारे इच्छुक शेतकरी व शेतकरी उत्पादक गट यांची प्राधान्याने निवड करण्यात
येते. निवडलेल्या गावात नोंदणीकृत शेतकरी उत्पादक गट नसल्यास नव्याने गटनिर्मीती करुन
आत्मा संस्थेकडे गटाची नोंदणी करणे आवश्यक आहे. निर्धारीत लक्षांकापेक्षा अधिक अर्ज
प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड केली जाते.
2)
नोंदणीकृत गटातील शेतक-याचे स्वतःचे नावे 7/12 व 8/अ उतारा असणे तसेच, अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी
स्वयंसाक्षांकीत जातीचा वैध दाखला अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.
3)
गटामध्ये पुरेशा प्रमाणात अनुसूचीत जाती/जमाती प्रवर्गातील शेतकरी नसल्यास सदर
प्रवर्गातील शेतक-यांची यादी तयार करुन निर्धारीत प्रमाणात सोडत पध्दतीने लाभार्थी
निवड प्रक्रिया सर्वासमक्ष करणे आवश्यक आहे.
4)
प्रवर्गनिहाय निर्धारीत प्रमाणानुसार सर्व प्रवर्गांमध्ये किमान 30 टक्के लाभ महिला शेतक-यांना 5 टक्के लाभ दिव्यांग शेतक-यांना दिला जातो.
v
अंमलबजावणीचे स्वरुप :
सदर अभियान क्षेत्र विस्तार व उत्पादकता
वाढ संकल्पनेवर राबविण्यात येते. समूह प्रात्यक्षिकांसाठी 11 हेक्टरचा समूह असावा.
v
घटकनिहाय आर्थिक मापदंड :
अ) प्रमुख घटक - बियाणे
अ.१) पायाभूत बियाणे उत्पादन, अ.२)
प्रमाणित बियाणे उत्पादन :-
v अनुदानाचा दर: राज्यासाठी
अधिसुचीत वाणांचे उत्पादीत पायाभूत बियाणासाठी उच्चतम
मर्यादा रु.२५००/क्वि.
v अनुदान पात्रतेचे निकष : महाबीज
व केंद्रीय संस्था यांच्याकडून राज्यांतर्गत उत्पादीत केलेल्या गळीतधान्य पिकांच्या 10 वर्षाचे आतील राज्यासाठी अधिसुचीत झालेल्या वाणांच्या पायाभूत व प्रमाणित बिजोप्तादनासाठी (महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या मुक्तता अहवालानुसार) उत्पादनाच्या समप्रमाणात किंवा उच्चतम रु.२५००/क्वि. प्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. तसेच, ५ वर्षातील वाणांच्या बियाणे
उत्पादनासाठी रु.१००/क्वि.
पूरक अनुदान अनुज्ञेय राहील.
अ.३) प्रमाणित बियाणे वितरण:-
v अनुदानाचा दर:
अ) सोयाबीन पिकासाठी किमतीच्या ५०% सुधारीत वाणासाठी रु.2000/क्वि. मर्यादेत
ब) संकरीत / तीळ पिकांच्या
वाणासाठी रु.८000/क्वि. मर्यादेत
क) इतर तेलबिया पिकांसाठी
किमतीच्या ५० % किंवा रु.४000 /क्वि. यापैकी जे कमी असेल
ते अनुदान अनुज्ञेय आहे.
v अनुदान पात्रतेचे निकष:
शासकीय बियाणे पुरवठादार संस्था यांच्याकडील मागील 15 वर्षातील राज्यासाठी
अधिसुचीत वाणांच्या प्रमाणित बियाणे वितरणासाठी अनुदान अनुज्ञेय राहील.
ब) प्रमुख घटक - तंत्रज्ञान प्रसारण:-
ब.१) पिक प्रात्याक्षिके (शेतकरी
शेतीशाळा संलग्न): -
v अनुदानाचा दर: निर्धारित
प्रात्यक्षिक तंत्रज्ञान पॅकेज प्रमाणे
पीकनिहाय उच्चतम मर्यादा
सोयाबीन रु.६०00/हे. जवस
रु.3000/हे
करडई रु.3000/हे. मोहरी
रु.3000/हे
भुईमुग रु. १०000/हे.
v अनुदान पात्रतेचे निकष :
विभागस्तरावर संलग्न कृषि विद्यापीठांच्या सल्ल्याने जिल्हानिहाय व पीकनिहाय प्रात्यक्षिक तंत्रज्ञान पॅकेज तयार करावीत. पिक प्रात्यक्षिकांसाठी सर्व निविष्ठा घटक पुरवठ्याकरीता सदर पीकासाठी दर्शविलेल्या उच्चतम मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील. रासायनिक खतावरील खर्च लाभार्थी
शेतकऱ्याने स्वतः करावयाचा आहे यासाठी अनुदान देय नाही.
ब.२) आय.पी.एम. शेतकरी
शेतीशाळा:-
v अनुदानाचा दर: एकूण ₹१25००/- प्रती प्रशिक्षण (शेतीशाळा
मार्गदर्शक सूचनांप्रमाणे)
v अनुदान पात्रतेचे निकष: Cropsap-शेतीशाळाच्या संदर्भीय दि. 2६/०५/२3 च्या मा. सु. व तदनंतर प्रसिद्ध होणाऱ्या अद्ययावत
सूचनांच्या धर्तीवर.
ब.३) शेतकरी प्रशिक्षण:-
v अनुदानाचा दर: रु. 24000/प्रशिक्षण प्रमाणे
v अनुदान पात्रतेचे निकष: 30 शेतक-यांच्या समुहासाठी 2 दिवसांकरीता
ब.४)
अधिकारी प्रशिक्षण:-
v अनुदानाचा दर: रु. ३६000/प्रशिक्षण प्रमाणे
v अनुदान पात्रतेचे निकष: 20 कर्मचारी समूहासाठी 2 दिवसांकरीता
क) प्रमुख घटक - उत्पादन वाढीसाठी निविष्ठा व सिंचन सुविधा
क.१)
जिप्सम,चुनखडी, गंधक :-
v
अनुदानाचा दर: उच्चतम मर्यादा रु. 750/हे.
v अनुदान पात्रतेचे निकष: उत्पादन वाढीसाठी कृषि निविष्ठा किंमतीच्या 50 टक्के किंवा अनुदान दराची उच्चतम मर्यादा यापैकी किमानप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.
क.२) जैविक खतांचा वापर:
v अनुदानाचा दर: उच्चतम मर्यादा रु.३००/हे.
v अनुदान पात्रतेचे निकष: उत्पादन वाढीसाठी कृषि निविष्ठा किंमतीच्या 50 टक्के किंवा अनुदान दराची उच्चतम मर्यादा
यापैकी किमानप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.
क.३) पिक
संरक्षण औषधे कीडनाशके/तणनाशके
,क.४) एन. पी. व्ही.चा वापर:-
v
अनुदानाचा दर: उच्चतम मर्यादा रु.५००/हे.
v अनुदान पात्रतेचे निकष: उत्पादन वाढीसाठी कृषि निविष्ठा किंमतीच्या 50 टक्के किंवा अनुदान दराची उच्चतम मर्यादा यापैकी किमानप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.
क.५) पाईप्स पुरवठा (कृषि
यांत्रिकीकरण उपअभियान मा.सुचनांप्रमाणे):-
v अनुदानाचा दर: किमतीच्या ५०% किंवा उच्चतम मर्यादा रु.15000 प्रती
लाभार्थी मर्यादेत
v अनुदान पात्रतेचे निकष: पाईप्सच्या प्रकारानुसार अनुदान दर
राहील (रु.५०/- प्रती मीटर एच.डी.पी.ई.पाईप, रु.३५/- प्रती मीटर
पी.व्ही.सी. पाईप व रु. २०/- प्रती मीटर एच.डी.पी.ई. लॅमीनेटेड पाईप)
ड ) प्रमुख घटक : फ्लेक्झी निधीप:-
ड.१) छोटे तेलघाणा सयंत्र :
v अनुदानाचा दर: किमतीच्या ५०% किंवा उच्चतम मर्यादा रु. १,८०,००० /- प्रती यंत्र
ड.२) डिझेल / विद्युत पंपसंच:
v अनुदानाचा दर: किंमतीच्या
५० टक्के किंवा उच्चतम रु.१००००/प्रती पंपसंच
याप्रमाणे.
ड.३) मनुष्यचलित टोकन
यंत्र :-
v अनुदानाचा दर: किंमतीच्या
५० टक्के किंवा उच्चतम रु.१००००/प्रती यंत्र याप्रमाणे.
ड.४) मनुष्यचलित सायकलवर चालणारे
सिड ड्रील:-
v अनुदानाचा दर: किंमतीच्या ५० टक्के किंवा उच्चतम रु.५०००/प्रती यंत्र
याप्रमाणे
v अनुदान पात्रतेचे निकष: वरील ड १ ते ४ साठी : कृषि यांत्रिकीकरण उपअभियान मार्गदर्शक सुचनांप्रमाणे
उच्चतम अनुदान मर्यादा लागू राहील.
ड.५) गोदाम उभारणी:-
v अनुदानाचा दर:
खर्चाच्या ५०% किंवा उच्चतम मर्यादा रु. १२.५०लाख / २५० मे. टन क्षमता
v अनुदान पात्रतेचे निकष: FPO / FPC/ शेतकरी गट यांना अनुदान अनुज्ञेय
राहील.
इ ) प्र.घ. : अभियान व्यवस्थापन खर्च: क्रॉप कटींग, कंत्राटी
कर्मचारी मानधन व आकस्मिक खर्चासाठी.
No comments:
Post a Comment