कृषि पायाभूत सुविधा योजना ( AIF )

 

योजनेची व्याप्ती-

            कृषि सहकार शेतकरी  कल्याण विभाग, नवी दिल्ली यांचेमार्फत सन २०२०-२१ ते २०३२-३३ या कालावधीत कृषि पायाभूत सुविधा योजना (Agriculture Infrastructure Scheme) राबविण्यात येणा-या असुन केंद्र शासनामार्फत सदर योजनेंतर्गत कृषि पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा  करणेकरीता लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

 

पात्र प्रकल्प -

            या योजनेअंतर्गत प्रामुख्याने प्राथमिक प्रक्रिया उधोगांना लाभ देण्यात येणार आहे.या योजनेत कापणी नंतरचे व्यवस्थापन उदा.-मार्केटिंग प्लॉटफॉर्म,गोदाम,पॅक हाऊस,मुरघास,संकलन केंद्र,वर्गवारी आणि प्रतवारीगृह शितगृह,पुरवठा सुविधा,प्राथमिक प्रक्रिया केंद्र,रायपनिंग चेंबर आणि सामुहिक शेतीकरीता आवश्यक इतर किफायतशिर प्रकल्पांचा(सेंद्रिय उत्पादने,जैविक निविष्ठा  उत्पादन प्रकल्प,अचूक शेती व्यवस्थापन) समावेश आहे.

 

पात्र लाभार्थी-

            सदर योजनेतंर्गत  प्राथमिक कृषि पत संस्था (PACs) विपणन सहकारी संस्था,शेतकरी उत्पादक संस्था

(PFOs) स्वंयसहाय्यता गट (SHG) , शेतकरी,संयुक्त उत्तरदायित्व गट,बहुउध्देशीय सहकारी संस्था, कृषि उधोजक,र्स्टाटअप आणि केंद्र /राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प यांना लाभ घेता येईल.

 

योजनेचे स्वरुप

            या वित्त पुरवठा योजनेअंतर्गत कोटी मर्यादेपर्यतच्या सर्व कर्जावर वार्षिक टक्के व्याज सुट असेल सदर सवलत ही जास्तीत जास्त वर्षापर्यत उपलब्ध आहे.तसेच पात्रा कर्जधारकांसाठी सुक्ष्म लघु उधोजक योजनेच्या पत हमी निधी ट्रस्ट अंतर्गत कोटी पर्यंतच्या कर्जासाठी या वित्त पुरवठा सुविधेतुन पत हमी संरक्षण उपलब्ध असेल.या संरक्षणाकरीता लागणारे शुल्क शासनामार्फत भरण्यात येईल.शेतकरी उत्पादक संस्थेकरीता कृषि सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या लघु कृषक कृषि व्यापार संघामार्फत राबविण्यात येणा-या पतहमी योजनेचा लाभ घेता येईल.केंद्र /राज्य शासनाच्या सध्याच्या अथवा भविष्यातील कोणत्याही योजनेअंतर्गत मिळणारे कोणतेही अनुदान या वित्त सुविधा प्रकल्पांतर्गत मिळु शकते.

 

सहभागी वित्त संस्था

            सर्व अनुसुचित व्यावसायिक बँका,अनुसुचित सहकारी बँका,प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) लघु वित्त बँका,बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) या वित्त पुरवठा करण्यासाठीचा फायदा घेणेसाठी राष्ट्रीय कृषि ग्रामीण विकास बँकेबरोबर (NABARD)/कृषि सहकार शेतकरी कल्याण विभाग यांचेबरोबर सांमजस्य करार (MoU) स्वाक्षरी करुन भाग घेऊ शकतात.

 

सहभाग घेणेसाठी प्रक्रिया

            प्रथम अर्जदारास ऑन लाईन पध्दतीने योजनेच्या पोर्टलवर नोंदणी करुन अधिकारपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.त्यानंतर लाभार्थी कर्जासाठी ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या फॉर्ममध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन शकतात. अर्जासोबत सविस्तर प्रकल्प अहवालाची मुळ प्रत आणि प्रकल्प अहवालाशी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी.तसेच अर्जदाराने सविस्तर प्रकल्प अहवालासह अर्ज कर्ज यदेणा-या वित्तीय संस्थेकडे मुल्यांकनासाठी पाठवावा.कर्ज मंजुर झाल्यानंतर निधी लाभार्थीच्या बँक खात्यात परस्पर जमा करण्यात येईल.

                     या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी कृषि मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली यांच्या agriinfra.dac.gov.in  या संकेतस्थळाला भेट देण्यात यावी.

 

      उध्दिष्ट पुर्ती-  (रक्कम रु.कोटीमध्ये)

 

लक्षांक

साध्य //२०२

साध्य ३१/०३/२०२४ मंजूर

प्रकल्प

साध्य %

भौतिक

आर्थिक

भौतिक

आर्थिक

एकुण लक्षांक ८४६० कोटी


२६९४

१३५२.४७

७२३१

४२८९

५१%

२०२3-4 चा लक्ष रु.२०३३
कोटी

 

२६९४

१३५२.४७

७२३१

४२८९

१२०%

 

 
*********************************************************************

कृषी योजनांचा अधिक माहिती साठी

      खालील कृषी विभागाची Whats App चॅनल, युट्युब चॅनल, टेलिग्राम चॅनल, फेसबुक पेज,          इन्स्टाग्राम, ट्विटर खाते, like and Follow or Subscribe करा.

     🎯 कृषी विभाग वेबसाईट : https://krishi.maharashtra.gov.in

     🎯 कृषी विभाग युट्युब चॅनल : https://youtube.com/@AgricultureDepartmentGoM

     🎯 कृषी विभाग Whats App              चॅनलhttps://whatsapp.com/channel/0029Va9TaWN8fewi8s27o53T

     🎯 कृषी विभाग टेलिग्राम चॅनलhttps://t.me/AgricultureDepartmentGoM

     🎯 कृषी विभाग इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/agricutlure_gom/

     🎯 कृषी विभाग फेसबुक पेज: https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM

     🎯 कृषी विभाग ट्विटर खाते: https://twitter.com/AgriDeptGoM

 

           

No comments:

Post a Comment