राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके

प्रस्तावना -

हे अभियान भात, गहू, कडधान्य, भरडधान्य (मका) व पौष्टिक तृणधान्य( ज्वारी, बाजरी, रागी) या पिकांसाठी राबविण्यात येत आहे. 

·         राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-कडधान्य हे राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

·         तर इतर पिकांसाठी ची अभियाने काही जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत.

·         सदर अभियानासाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा 60 टक्के व राज्य हिस्सा 40 टक्के असा आहे.

वरिल पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढावी या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

----------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानकडधान्य अंतर्गत  राबविण्यात येणारे घटक-

1.पिक प्रात्यक्षिके -

 पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय कृषी सह संचालक यांचे स्तरावर संलग्न कृषी  विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी, रासायनिक खतावरिल खर्च लाभार्थी शेतकरी यांनी स्वत: करावयाचा आहे यासाठी अनुदान देय नाही.

अ. सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्यक्षिके - रु. 9000 प्रती हेक्टर अनुदान. 

ब. आंतर पिक प्रात्यक्षिक - रु. 9000 प्रती हेक्टर अनुदान.

क. पिक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके - रु.15000 प्रती हेक्टर अनुदान.

2. राज्यासाठी अधिसूचित अधिक उत्पादन देणारे वाणाचे *प्रमाणित बियाणे वितरण*-

अ. मागिल 10 वर्षाच्या आतील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण - किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.5000 प्रती क्विंटल अनुदान.

ब. 10 वर्षाच्या वरील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण - किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.2500 प्रती क्विंटल अनुदान.

3. एकात्मिक किड/रोग व्यवस्थापन-

1. किडनाशके - यासाठी 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर अनुदान देय आहे.

2. तण नाशके - तण नाशकाच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के ,कमाल रु.500 प्रती हे. अनुदान देय आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने  खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या तण नाशकांची खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.

४. पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण- 

एकुण रु.14000 प्रती प्रशिक्षण (रु.3500 प्रती सत्र). 30 शेतकरी यांचे साठी 4 सत्राकरिता (2 सत्र खरीप मध्ये व 2 सत्र रबी मध्ये).

५. प्रकल्प व्यवस्थापन चमू-  तंत्र सल्लागार व तंत्र सहाय्यक.

 -------------------------------------------------------------------------------------------

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानभात अंतर्गतराबविण्यात येणारे घटक-

1.पिक प्रात्यक्षिके -

 पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय कृषी सह संचालक यांचे स्तरावर संलग्न कृषी  विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी, रासायनिक खतावरिल खर्च लाभार्थी शेतकरी यांनी स्वत: करावयाचा आहे यासाठी अनुदान देय नाही.

अ. सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्यक्षिके - रु. 9000 प्रती हेक्टर अनुदान. 

ब. पिक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके - रु.15000 प्रती हेक्टर अनुदान.

 

2. राज्यासाठी अधिसूचित अधिक उत्पादन देणारे वाणाचे *प्रमाणित बियाणे वितरण*-

अ. संकरीत वाण - किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.१०000 प्रती क्विंटल अनुदान.

ब. मागिल 10 वर्षाच्या आतील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण - किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.२000 प्रती क्विंटल अनुदान.

क. 10 वर्षाच्या वरील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण - किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.१०00 प्रती क्विंटल अनुदान.

3. एकात्मिक किड/रोग व्यवस्थापन-

1. किडनाशके - यासाठी 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर अनुदान देय आहे.

2. तण नाशके - तण नाशकाच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के,कमाल रु.500 प्रती हे. अनुदान देय आहे.

त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने  खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या तण नाशकांची खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.

४. पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण- 

एकुण रु.14000 प्रती प्रशिक्षण (रु.3500 प्रती सत्र). 30 शेतकरी यांचे साठी 4 सत्राकरिता (2 सत्र खरीप मध्ये व 2 सत्र रबी मध्ये).

-------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानगहू अंतर्गतराबविण्यात येणारे घटक-

 

1.पिक प्रात्यक्षिके -

 पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय कृषी सह संचालक यांचे स्तरावर संलग्न कृषी  विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी, रासायनिक खतावरिल खर्च लाभार्थी शेतकरी यांनी स्वत: करावयाचा आहे यासाठी अनुदान देय नाही.

अ. सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्यक्षिके - रु. 9000 प्रती हेक्टर अनुदान. 

ब. पिक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके - रु.15000 प्रती हेक्टर अनुदान.

 

2. राज्यासाठी अधिसूचित अधिक उत्पादन देणारे वाणाचे *प्रमाणित बियाणे वितरण*-

अ. मागिल 10 वर्षाच्या आतील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण - किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.२000 प्रती क्विंटल अनुदान.

. 10 वर्षाच्या वरील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण - किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.१०00 प्रती क्विंटल अनुदान.

3. एकात्मिक किड/रोग व्यवस्थापन-

1. किडनाशके - यासाठी 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर अनुदान देय आहे.

2. तण नाशके - तण नाशकाच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के,कमाल रु.500 प्रती हे. अनुदान देय आहे.

त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने  खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या तण नाशकांची खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.

४. पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण- 

एकुण रु.14000 प्रती प्रशिक्षण (रु.3500 प्रती सत्र). 30 शेतकरी यांचे साठी 4 सत्राकरिता (2 सत्र खरीप मध्ये व 2 सत्र रबी मध्ये).


No comments:

Post a Comment