राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA) अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD)

 

योजनेचा उद्देश :

        शेतक-यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करून नवीन उपजिविकेच्या साधनांची उपलब्धता करणे    त्याआधारे त्यांचे जीवनमान उंचावणे.

        निरनिराळ्या एकात्मिक शेती पध्दतींचा अवलंब करून दुष्काळ, पूर व हवामानातील अनपेक्षित  बदलामुळे होणारे नुकसान टाळणे.

        अद्ययावत कृषि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषि उत्पादन वाढविणे व शाश्वत रोजगार उपलब्ध करणे.

        कोरडवाहू क्षेत्रातील कृषि उत्पादनातील जोखीम कमी करून शेतक-यांचा कोरडवाहू शेतीबाबत आत्मविश्वास वाढविणे.

 

समाविष्ट जिल्हे : राज्यातील सर्व जिल्हे

 

लाभार्थी निवडीचे निकष :

1) अल्प व अत्यल्प भूधारक व महिला शेतक-यांना प्राधान्य द्यावे. 

2) कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD) योजनेंतर्गत किमान 50 % निधी वर नमूद लाभधारकांवर खर्च करण्यात यावा.

3) प्रस्तावित निधीच्या 16% 8% किंवा अनु.जाती / जमाती यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुक्रमे अनु.जाती व अनु. जमाती या प्रवर्गासाठी तरतूद करण्यात यावी.

4) लाभार्थी हा सध्याच्या प्रचलित पीक पध्दतीमध्ये बदल करुन एकात्मिक शेती पध्दतीतील बाबी       राबविण्यास इच्छुक असला पाहीजे.

योजनेचे स्वरूप :

1)  कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD) योजनेच्या अंमलबजावणीसाठी समूह आधारित प्रकल्प (Cluster Based approach) हे धोरण स्वीकारले आहे. यामध्ये प्रत्येक उपविभागातून दोन प्रकल्प (Cluster) निवडायचे आहेत. संपूर्ण एका गावाचे क्षेत्र प्रकल्प क्षेत्र म्हणून निवडण्यात येते.

2)  केंद्र व राज्य शासनाकडून अनु.जाती / अनु.जमाती या प्रवर्गासाठी स्वतंत्रपणे निधी वितरीत केला  जातो. सदर निधी त्या त्या प्रवर्गावरच खर्च करणे बंधनकारक आहे.

3)  प्रकल्प निवडताना कोरडवाहू शाश्वत शेती विकास कार्यक्रम (RADP), कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD) व कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रमांतर्गत सदर प्रकल्पामध्ये राबविलेला नसावा.

 

घटक निहाय आर्थिक मापदंड :

1) फळपीक आधारीत शेती पध्दती रु. 25,000 प्रती हे.

2) दुग्धोत्पादक पशुधन आधारीत शेती पध्दती रु. 40,000 प्रती हे.

3) इतर पशुधन आधारीत शेती पध्दती रु. 25,000 प्रती हे.

4) ग्रीन हाऊस टयुब्युलर टाईप नैसर्गिक वायुविजन  रु. 468 प्रती चौ.मी.

5) शेडनेट हाऊस रु. 355 प्रती चौ.मी. 

6) मूरघास युनिट रु. 1,25,000 प्रती यूनिट.

7) मधुमक्षिका पालन रु. 2000 प्रती कॉलनी.

8) काढणी पश्चात तंत्रज्ञान रु. 4000 प्रती चौ.मी.

9) गांडूळ खत युनिट (कायमस्वरूपी) रु. ५०,000 प्रती यूनिट.

१०) हिरवळीचे खत रु. 2000 प्रती हे.

No comments:

Post a Comment