कृषि यांत्रिकीकरण

कृषि यांत्रिकीकरण


v  योजनेचा उद्देश :

1.     शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे.

2.    विभागनिहाय पीकरचने नुसार गरजेनुरुप व मागणी प्रमाणे पूर्वतपासणी केलेली दर्जेदार कृषिऔजारे अनुदानावर उपलब्ध करुन देणे.

3.    कृषि उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहीत करणे.

 

v  समाविष्ठ जिल्हे -सर्व जिल्हे

 

v  लाभार्थी निवडीचे निकष :

जिल्ह्यातील प्रवर्गनिहाय खातेदार संख्या, पेरणीखालील क्षेत्र, मागील वर्षातील मंजूर कार्यक्रम, मागील ६ वर्षांमधील खर्च विचारात घेऊन जिल्हानिहाय लक्षांक देण्यात येतात.इच्छुक शेतकऱ्यांकडून https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर अर्ज मागविण्यात येतात. लाभार्थी निवडीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाइन लॉटरी पद्धतीने जेष्ठताक्रम निश्चित करून पूर्वसंमती देण्यात येत आहे. लाभार्थी निवड ते अनुदान अदायगीपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. शेतकरी असणे अनिवार्य आहे.

 

v  योजनेचे स्वरूप :

       केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचानानुंसार अधिसूचित कृषी यंत्र/औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते.

       यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टरचलित औजारे, ट्रॅक्टरचलित पिक संरक्षण औजारे व पिक काढणी पश्चात प्राथमिक प्रक्रिया औजारे यांचा समावेश आहे.

       सर्वसाधारणपणे किमतीच्या ४० ते ५० टक्के किंवा केंद्र शासनाने घोषित केलेली उच्चतम अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ते, याप्रमाणे अनुदान देण्यात येते.

       कृषी औजारे बँकेच्या स्थापनेसाठी भांडवली खर्चाच्या ४०% अनुदान देण्यात येते.

 

v  योजनेची अंमलबजावणी :

पूर्वसंमती नंतर शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार खुल्या बाजारातून खरेदीची मुभा देण्यात येत आहे. खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यामधून चेक/डीडी/ऑनलाईन पद्धतीने देयकाची अदायगी करणे आवश्यक ,थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) पद्धतीचा अवलंब करून अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.

 

v  घटकनिहाय आर्थिक मापदंड:

अ.क्र.

यंत्र / औजारे प्रकार

अनुदान दर (**)

अल्प / अत्यल्प / महिला/SC/ST 50 %

इतर 40 %

1

ट्रॅक्टर ( ***)

रु. 1,25,000

रु. 1,00,000

2

पॉवर टिलर

50%

40%

3

स्वंयचलीत / विशेष स्वंयचलीत यंत्रे

50%

40%

4

ट्रॅक्टर चलीत औजारे

50%

40%

1) जमिन सुधारणा मशागत औजारे

50%

40%

2) पेरणी लागवड व कापणी औजारे

50%

40%

3) अंतरमशागत औजारे

50%

40%

4) पिक अवशेष व्यवस्थापन यंत्र / औजारे

50%

40%

5) कापणी व मळणी यंत्र / औजारे

50%

40%

5

काढणी पश्चात यंत्रे

60%

50%

6

मनुष्य व बैल चलीत यंत्र / औजारे

50%

40%

7

पिक संरक्षण उपकरणे

50%

40%

कृषि औजारे बॅकेची स्थापना

40 %

(***) ट्रॅक्टर या घटकासाठी अनुदान मर्यादा वरिल प्रमाणे सिमित करण्यात आलेली आहे.

(**) किंमतीच्या 50/40 % किंवा केंद्र शासनाने निर्धारीत केलेल्या रक्कम या पैकी जे कमी असेल ते

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खालील कृषी विभागाची Whats App चॅनल, युट्युब चॅनल, टेलिग्राम चॅनल, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, ट्विटर खाते, like and Follow or Subscribe करा.


कृषी विभाग वेबसाईट : https://krishi.maharashtra.gov.in


कृषी विभाग युट्युब चॅनल : https://youtube.com/@AgricultureDepartmentGoM


कृषी विभाग Whats App चॅनल: https://whatsapp.com/channel/0029Va9TaWN8fewi8s27o53T


कृषी विभाग टेलिग्राम चॅनल: https://t.me/AgricultureDepartmentGoM


कृषी विभाग इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/agricutlure_gom/


कृषी विभाग फेसबुक पेज : https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM


कृषी विभाग ट्विटर खाते : https://twitter.com/AgriDeptGoM



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

2 comments: