कृषी यांत्रिकीकरण
v राबविण्यात येणाऱ्या योजना-
१. केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान (SMAM)-(६०:४० केंद्र:राज्य )
२.
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण (STATE MECHANIZATION) (१०० % राज्य)
३. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प (RKVY- MECHANIZATION)
)
-(६०:४० केंद्र:राज्य )
v योजनेचा उद्देश :
1.
शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास
प्रोत्साहन देणे.
2.
विभागनिहाय पीकरचने नुसार गरजेनुरुप व मागणी प्रमाणे
पूर्वतपासणी केलेली दर्जेदार कृषी औजारे अनुदानावर उपलब्ध करुन देणे.
3.
कृषी उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या
वापरासाठी प्रोत्साहीत करणे.
v समाविष्ठ जिल्हे -सर्व जिल्हे
v लाभार्थी निवडीचे निकष :
जिल्ह्यातील प्रवर्गनिहाय
खातेदार संख्या, पेरणीखालील क्षेत्र, मागील वर्षातील मंजूर कार्यक्रम, मागील ६
वर्षांमधील खर्च विचारात घेऊन जिल्हानिहाय लक्षांक देण्यात येतात.
इच्छुक शेतकऱ्यांकडून https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर अर्ज
मागविण्यात येतात. लाभार्थी निवडीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाइन लॉटरी पद्धतीने
जेष्ठताक्रम निश्चित करून पूर्वसंमती देण्यात येत आहे. लाभार्थी निवड ते अनुदान
अदायगीपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. शेतकरी असणे
अनिवार्य आहे.
v
योजनेचे
स्वरूप :
·
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचानानुंसार अधिसूचित
कृषी यंत्र/औजारांच्या
खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते.
·
यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टरचलित
औजारे, ट्रॅक्टरचलित पिक
संरक्षण औजारे व पिक काढणी पश्चात प्राथमिक प्रक्रिया औजारे यांचा समावेश आहे.
·
सर्वसाधारणपणे किमतीच्या ४० ते ५० टक्के किंवा केंद्र शासनाने घोषित केलेली उच्चतम अनुदान मर्यादा
यापैकी कमी असेल ते, याप्रमाणे अनुदान देण्यात येते.
·
कृषी औजारे
बँकेच्या स्थापनेसाठी भांडवली खर्चाच्या ४०% अनुदान देण्यात
येते.
v योजनेची अंमलबजावणी :
पूर्वसंमती नंतर
शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार खुल्या बाजारातून खरेदीची मुभा देण्यात येत आहे.
खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यामधून चेक/डीडी/ऑनलाईन पद्धतीने
देयकाची अदायगी करणे आवश्यक,थेट लाभ हस्तांतर
(डीबीटी) पद्धतीचा अवलंब करून अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या आधार संलग्न
बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.
v घटकनिहाय आर्थिक मापदंड:
अ.क्र. |
यंत्र / औजारे
प्रकार |
अनुदान दर (**) |
|
अल्प / अत्यल्प
/ महिला/SC/ST (50 %) |
इतर
40 % |
||
1 |
ट्रॅक्टर ( ***) |
रु. 1,25,000 |
रु. 1,00,000 |
2 |
पॉवर टिलर |
50% |
40% |
3 |
स्वंयचलीत / विशेष स्वंयचलीत यंत्रे |
50% |
40% |
4 |
ट्रॅक्टर चलीत औजारे |
50% |
40% |
1) जमिन सुधारणा मशागत औजारे |
50% |
40% |
|
2) पेरणी लागवड व कापणी औजारे |
50% |
40% |
|
3) अंतरमशागत औजारे |
50% |
40% |
|
4) पिक अवशेष व्यवस्थापन यंत्र / औजारे |
50% |
40% |
|
5) कापणी व मळणी यंत्र / औजारे |
50% |
40% |
|
5 |
काढणी पश्चात यंत्रे |
60% |
50% |
6 |
मनुष्य व बैल चलीत यंत्र / औजारे |
50% |
40% |
7 |
पिक संरक्षण उपकरणे |
50% |
40% |
८ |
कृषि औजारे बॅकेची स्थापना |
40 % |
(***) ट्रॅक्टर या घटकासाठी अनुदान
मर्यादा वरिल प्रमाणे सिमित करण्यात आलेली आहे.
(**) किंमतीच्या 50/40 % किंवा केंद्र शासनाने
निर्धारीत केलेले देय
अनुदान या पैकी जे कमी असेल ते
सन 2023-24 वितरीत निधी व खर्चाचा तपशिल सन 2023-24 चा प्रस्तावित कार्यक्रम
(रक्कम रु.कोटी)
अ. क्र. |
योजनेचे नाव |
मंजुर कार्यक्रम |
वितरीत निधी |
माहे मार्च 2024 अखेर
खर्च |
वितरीत निधीशी खर्चाची टक्केवारी |
वाटप औजारे |
प्रलंबित
दायित्व (२०२३-24) |
प्रलंबित
दायित्व (लाभार्थी संख्या) |
सन
2024-25 साठी प्रस्तावित कार्यक्रम |
१. |
कृषी यांत्रिकीकरण |
१४५.०० |
१६९.२३ |
१६८.०९ |
९९ |
२३३१४ |
४७.९१ |
६१५० |
२३९.५८ |
२. |
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण |
२७०.०० |
२६५.८८ |
२१७.९० |
८२ |
३१३८२ |
२४.८६ |
२०३० |
२५०.०० |
३. |
रा.कृ.वि.यो. |
६२.०३ |
५१.२९ |
४८.५८ |
९४ |
१०२२२ |
१३.४५ |
२१३४ |
१३.४५ (उर्वरित
कार्यक्रम) |
|
एकूण |
४७७.०३ |
४८६.४० |
४३४.५७ |
८९ |
६४९१८ |
८६.२२ |
१०३१४ |
४९०.०० |
Ø
सन
२०२३-२४ या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी
यांत्रिकीकरण या योजनांमधून माहे मार्च २०२४ अखेर रक्कम रु.४३५ कोटी निधीचे ६४९१८
लाभार्थींना एकूण १६९०३ ट्रॅक्टर, २३०२ पॉवर टिलर, ४०४५३ ट्रॅक्टर चलित औजारे, १७ ड्रोन, १०१ औजारे बँक व ५१४२ इतर औजारे असे एकूण
६४९१८ औजारांचे वाटप.
Ø
सन
२०२1-२2 ते २०२3-२४ या मागील ३ वर्षात
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी
यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण या योजनांमधून
माहे मार्च २०२४ अखेर रक्कम रु.१३५६.७६ कोटी निधीचे २१४७४३ लाभार्थींना एकूण ४०३४२
ट्रॅक्टर, ८४७० पॉवर टिलर, १४६७५५ ट्रॅक्टर चलित औजारे, २५ ड्रोन, ८३३ औजारे बँक व १८३१८ इतर औजारे असे एकूण २१४७४३
औजारांचे वाटप.
Ø
सन
२०२४-२५ या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत एकूण ४९० कोटी निधीचा कार्यक्रम
प्रस्तावित असून साधारणपणे ७१००० लाभार्थींना ७७५०० अवजारांचे वाटप अपेक्षित.
Ø
सन
२०२३-२४ या आर्थिक वर्षातील कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेंतर्गत ६१५०
लाभार्थींचे २१६६ ट्रॅक्टर, १७० पॉवर टिलर, ३५२४ ट्रॅक्टर चलित औजारे व २९० इतर औजारे असे एकूण रु.४७.९१ कोटी रकमेचे
प्रलंबित दायित्व.
Ø
योजना
राबविताना येणाऱ्या अडचणी
१ . प्रलंबित दायित्वाचे अनुदान
वेळेवर उपलब्ध होणे आवश्यक आहे .
२. लाभार्थीने अर्ज केल्यानंतर १०
दिवसामध्ये कागदपत्रे
upload न केल्यास व पुर्व संमती
दिल्यानंतर औजारे खरेदी करून ३० दिवसा मध्ये
कागदपत्रे upload न केल्यास
अर्ज बाद
करणे
आवश्यक व या बाबीचे अधिकार जिल्हास्तरावर देणे गरजेचे.
7066665366
ReplyDeleteShetkari Yojana, Mahadbt Scheme
ReplyDelete