डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (१००% टक्के राज्य पुरस्कृत)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

 

Ø  योजनेचा उद्देश   :-   अनुसूचित जाती /नवबौध्द प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देणे.

      Ø  समाविष्ट जिल्हे  :- मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व 34 जिल्ह्यांमध्ये सदर योजना राबविण्यात येत आहे.

Ø  लाभार्थी निवडीचे निकष   :-

1. लाभार्थी हा अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.

2. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
3. ज्या शेतक-यांना नविन विहीर या घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी किमान 0.40 हे

     शेतजमीन असणे आवश्यक आहे. सामुहिक शेतजमीन किमान 0.40 हे धारण करणारे एकत्रीत कुटुंब 

     नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.

4. ज्या शेतक-यांना नवीन विहीर व्यतिरीक्त इतर घटकांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी किमान

    0.20 हे शेतजमीन असणे आवश्यक आहे.

5. सदर योजनेंतर्गत कमाल शेतजमीनीची अट 6.00 हे आहे.

6. शेतकऱ्याच्या नावे जमीनधारणेचा 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक आहे.

    (नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील)

7. लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.

8. अनुसूचित जाती/ नवबौध्द शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.1,50,000/- पेक्षा जास्त

     नसावे.

9. ज्या शेतकऱ्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1,50,000/- चे मर्यादेत आहे अशा  

           शेतक-यांनी संबंधीत तहसिलदार यांचेकडून मागील आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा अद्यावत दाखला घेणे व  अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.

10. लाभार्थीस योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.

Ø  योजनेचेे स्वरुप/घटकनिहाय आर्थिक मापदंड:- अनुसुचित जाती/नवबौध्द प्रवर्गातील शेतक-यांना खालील 7 बाबींवर योजनेंतर्गत अनुदान अनुज्ञेय आहे.

अ.क्र.

बाब

अनुदान मर्यादा (रुपये)

1

नवीन विहीर

2,50,000/-

2

जुनी विहीर दुरुस्ती

50,000/-

3

इनवेल बोअरींग

20,000/-

4

वीज जोडणी आकार

10,000/-

5

शेततळ्यांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण

1,00,000/-

6

सुक्ष्म सिंचन संच

ठिबक - 50,000/-          तुषार - 25,000/-

7

पंप संच

20,000/-

 

·         नवीन विहीर पॅकेज - नवीन विहीर, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक, पंप संच, असे एकुण रु. 3.05 ते 3.30 लाख.

·         जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज - जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक, पंप संच , असे एकुण रु. 1.05 ते 1.30 लाख.

·         शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज - शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक, पंप संच असे एकुण रु. 1.55 ते 1.80 लाख.

·         लाभार्थ्याकडे जर काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ विहीत मर्यादेत देण्यात येईल.

·         उपरोक्त घटकांचा लाभ घेतल्यानंतरही लाभार्थ्याने ईनवेल बोअरींग या घटकाची मागणी केल्यास सदर घटकांचा अतिरिक्त लाभ देण्यात येईल.

·         सोलरपंपासाठी अनुदानजर शेतक-यास महावितरण कंपनीकडून सोलरपंप मंजूर झाला असेल तर पंपसंच व वीज जोडणीसाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत (रु.30,000/-) लाभार्थी हिस्स्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येईल.

Ø  योजनेची अंमलबजावणी :- क्षेत्रीय स्तरावर सदर योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाकडुन करण्यात आहे.

घटक अंमलबजावणी :-

1) नवीन विहीरनवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने यापूर्वी केंद्र / राज्य / जिल्हा परिषद अथवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून नवीन सिंचन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा. तसेच, यापुर्वी शासकीय योजनेतून घेतलेल्या व अर्धवट राहीलेल्या अपुर्ण विहीरीचे काम करण्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाभार्थ्याच्या 7/12 वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास या घटकाचा लाभ घेता येणार नाही. नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासुन 500 फुटाचे अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी. भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरीष्ठ भू वैज्ञानिक यांचेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

2) जुनी विहिर दुरुस्ती : जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या 7/12 वर विहीरीची नोंद असावी. विहीर दुरुस्तीच्या कामास उच्चतम अनुदान मर्यादेपेक्षा (रु.50,000/-) अधिक रक्कम लागल्यास लाभार्थींने स्वत: उभी करावयाची आहे.

3) इनवेल बोअरींग : नवीन विहीर / जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याने इनवेल बोअरींगची मागणी केल्यास रु. 20,000/- च्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील. इनवेल बोअरींगचे काम करतांना खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक निकषानुसार ठिकाणाची योग्यता (Feasibility Report) भुजल सर्वेक्षण यंत्रणेकडून प्राप्त करुन घ्यावा.

4) वीज जोडणी आकार : नवीन विहीर पॅकेज / जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज / शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेजमधील तथा आवश्यकतेनुसार केवळ वीजजोडणी मागणी करणाऱ्या लाभार्थ्याने विद्युत वितरण कंपनीकडे कोटेशन भरल्याची पावती सादर केल्यानंतर खातरजमा करुन लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात इलेक्ट्रॉनीक फंड ट्रांसफर व्दारे विहीत अनुदान मर्यादेत अनुदान वर्ग करण्यात येईल.

5) शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण : ज्या शेतक-यास ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणा-या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचे पात्रता निकष पुर्ण करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याने शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण या घटकाची मागणी केल्यास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या मार्गदर्शक सुचना व आर्थिक मापदंडानुसार प्रत्यक्ष खर्च किंवा          रु. 1,00,000/- यापेक्षा जी रक्कम कमी असेल त्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील.

6) सुक्ष्म सिंचन संच : डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या योजनेतून सुक्ष्म सिंचन या बाबीचा लाभ घेवू इच्छिणा-या शेतक-यांना प्रथमत: प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-प्रति थेंब अधिक पिक योजनेमधून लाभ घेणे अपेक्षीत असून या योजनेमधून फक्त Top up  साठी अनुदान देण्यात येईल.

7) पंपसंच (विद्युत) : पंपसंचाच्या लाभासाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना पंपसंच खरेदीकरीता कृषि अधिकारी (विघयो), पंचायत समिती यांनी पुर्वसंमती घ्यावी. सदर लाभार्थ्यांनी एक महिन्याच्या कालावधीत पंपसंचाची खरेदी करणे आवश्यक राहील अन्यथा संबंधीत शेतकऱ्यांची पुर्वसंमती रद्द करण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी पंपसंचाचे रितसर तपासणी (testing) करुन ते BIS अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (standards) असल्याचे प्रमाणित केले असेल त्याच पंपसंचाची पुर्वसंमती प्राप्त लाभार्थी शेतकऱ्याने खरेदी करावयाची आहे.

या योजनेसाठी महा-डीबीटी पोर्टलचे www.mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

 

5 comments:

  1. विहीरेच्यकाम झाल्यावर पौसै चा चेक कधी भेटतो.

    ReplyDelete
  2. Sir Atta Sadhya Kontya Scheame Chalu Ahe

    ReplyDelete
  3. I Want Promote My App Contact Me https://play.google.com/store/apps/details?id=com.kisan.khoj&hl=en-IN

    ReplyDelete