महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम
योजनेतंर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग
शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक
शेतजमीनीवर फळबाग लागवड-
अ) लाभार्थी
पात्रता-
अ) अनुसुचित जाती (Schedule Caste)
ब) अनुसुचित जमाती (Schedule Tribes)
क) भटक्या जमाती (Nomadic Tribes)
ड) निरधिसुचीत जमाती (विमुक्त जमाती De-notified Tribes)
इ) दारिद्र रेषेखालील इतर कुटुंबे (Families below the poverty line)
फ) स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे (Women-headed households)
ग)दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे (physically handicapped headed households)
ह) जमीन सुधारणांचे लाभार्थी ( benificiaries of land reforms)
ई) प्रधान
मंत्री आवास योजना - ग्रामीण योजने खालील लाभार्थी (benificiaries under
the Pradhan Mantri Awaas Yojana)
ज) अनुसुचित
जमातीचे व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्के
मान्य करणे) अधिनियम 200६
(२००७ चा २) खालील पात्र लाभार्थी (benificiaries under Schedule
Tribes and other Traditionl Forest Dwellers )
उपरोक्त प्रवर्गामधील (अ) ते (ज) पात्र लाभार्थींना
प्राधान्य देण्यात आल्यानंतर, कृषि
कर्ज माफी योजना, 2008 यामध्ये
व्याख्या केलेला अल्पधारक [1 हेक्टरपेक्षा
जास्त पण 2 हेक्टर (5 एकर)
पर्यंत जमीन असलेले शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)] व सीमांत भूधारक शेतकरी [1 हेक्टर
पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)] यांच्या जमिनीवरील कामांना
शर्तीच्या अधिनतेने प्राधान्य देण्यात यावे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजनेसाठी जॉब कार्ड धारक वरील अ ते ज प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती
वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
ब ) अर्ज कुठे करावा-
तालुका कृषि अधिकारी कार्यालय
क) कलमे / रोपे खरेदी कोठून करावीत
1.
कृषि विभागाच्या
रोपवाटिका
2.
कृषि विद्यापिठांच्या
रोपवाटिका
3.
खाजगी शासन मान्यता
प्राप्त (पंजीकृत) रोपवाटिका
4.
सामाजिक वनीकरण विभाग
किंवा अन्य शासकीय विभाग रोपवाटिका.
5.
परवानाधारक खाजगी
रोपवाटिकेतून रोपे/कलमे खरेदी करण्याची गरज पडल्यास आयुक्त कृषी द्वारे लागू
केलेल्या दरात ते कलमे/रोपे खरेदी करता येईल
6.
कलमे रोपे उपलब्धतेबाबतच्या अद्यावत माहितीसाठी National
nuursery portal चे nnp.nhb.gov.in संकेत
स्थळाचा वापर करण्यात यावा.
ड ) योजनेत समाविष्ट
फळपिके / वृक्ष-
१) आंबा २) काजू ३) चिकू
४) पेरु ५) डाळिंब ६) संत्रा ७) मोसंबी ८) कागदी लिंबू ९) नारळ १०) बोर ११)सिताफळ
१२) आवळा १३) चिंच (विकसीत जाती) १४) कवठ १५) जांभुळ १६) कोकम १७) फणस १८) अंजीर
१९) सुपारी २०) बांबू २१) साग २२) जड्रोफा २३) गिरीपुष्प २४) कडीपत्ता २५) कडूलिंब
२६) सिंधी २७) शेवगा २८) हदगा २९) पानपिंपरी ३०) केळी (३ वर्ष) ३१) ड्रॅगनफुट ३२)
अॅव्हाकॅडो ३३) द्राक्ष ३४) चंदन ३५) खाया ३६) निम ३७) चारोली ३८) महोगनी ३९)
बाभूळ ४०) अंजन ४१) खैर ४२) ताड ४३) सुरु ४४) रबर ४५) महारुख ४६) मँजियम ४७)
मेलिया डुबिया ४८) तुती (मलबेरी) ४९) ऐन ५०) शिसव ५१) निलगिरी ५२) सुबाभुळ ५३)शेमी
५४) महुआ ५५) गुलमोहर ५६) बकान निब ५७) चिनार ५८) शिरीष ५९) करवंद
फुलझाड
- १) गुलाब २) मोगरा ३) निशीगंध ४) सोनचाफा
औषधी
वनस्पती - १) अर्जुन, २)
असान, ३) अशोका, ४)
बेहडा, ५) हिरडा, ६) बेल, ७)
टेटु, ८) डिकेमाली, ९)
रक्तचंदन, १०) रिठा, ११)
लोध्रा, १२) आइन, १३)
शिवन, १४) गुग्गुळ, १५)
बिब्बा १६) करंज
मसाल्याची
पिके - १) लवंग, २)
दालचिनी,३) मिरी ४) जायफळ
इ) फळपिेनिहाय
प्रती हेक्टरी मापदंड (मजूरी
रु. 297/-)
ई) लागवड
कालावधी -
जून ते नोव्हेंबर
*********************************************************************
खालील कृषी विभागाची Whats App चॅनल, युट्युब चॅनल, टेलिग्राम चॅनल, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, ट्विटर खाते, like and Follow or Subscribe करा.
🎯 कृषी विभाग वेबसाईट : https://krishi.maharashtra.gov.in
🎯 कृषी विभाग युट्युब चॅनल : https://youtube.com/@AgricultureDepartmentGoM
🎯 कृषी विभाग Whats App चॅनल:
https://whatsapp.com/channel/0029Va9TaWN8fewi8s27o53T
🎯 कृषी विभाग टेलिग्राम चॅनल: https://t.me/AgricultureDepartmentGoM
🎯 कृषी विभाग इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/agricutlure_gom/
🎯 कृषी विभाग फेसबुक पेज: https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM
🎯 कृषी विभाग ट्विटर खाते: https://twitter.com/AgriDeptGoM
Peru lagwadi vishyi mahiti
ReplyDeleteShitafal vishyi mahiti pahije
ReplyDeleteShitafal vishyi mahiti sangha
ReplyDeleteCall me 📞 9922042652 Deepak karanjaeane
ReplyDelete238
ReplyDeleteSir total subsidy amount bhetay ka
ReplyDeleteमापदंड 248 प्रमाणे
ReplyDeletePuraskar pane ke liye Kya kare
ReplyDelete