एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्प उभारणी

                                      एकात्मिक पॅक हाऊस

  एकात्मिक पॅक हाऊस कन्व्हेअर बेल्ट, संकलन प्रतवारी केंद्र, वॉशिंग ड्राईंग यार्ड आणि भारत्तोलन, . सुविधांसह (Integrated Pack House with facilities for conveyer belt, sorting, grading units, washing, drying and weighing

प्रकल्पाचे तांत्रिक निकष -

·                  यामध्ये फळपीके,फूलपीके, भाजीपाला, औषधी सुगंधी वनस्पती यांच्या आवश्यकतेप्रमाणे किमान 16 मे.टन प्रती दिवस म्हणजेच 2 मे.टन प्रतीतास या क्षमतेच्या एकात्मिक पॅक हाऊस ची उभारणी करणे बंधनकारक राहील. यामध्ये फळपिकांच्या वनस्पतींच्या आवश्यकते प्रमाणे स्वच्छता, प्रतवारी, उत्पादनाचे मुळ रुपात बदल करता काढणीपश्चात प्रक्रिया पॅकिंग, सिलिंग, यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री म्हणजेच 1. Receiving Area 2. Enclosed Covered Sorting & Grading area 3. Sorting & Grading Conveyer Belt  (2 मे.टन प्रतीतास या क्षमता) 4. Washing/ Drying Equipment 5. Packaging Area असणे आवश्यक आहे.

·                  कच्चामाल तयार मालासाठी साठवणुक सुविधा, हाताळणीसाठी आवश्यक यंत्रणा म्हणजेच Weighing Balance, कायमस्वरूपीचे वॉशिंग युनिट, ट्रॉली, प्लॅस्टिक क्रेटस्, लिप्टर्स, पाण्याची सुविधा . बाबींचा समावेश राहील

·                  द्राक्ष पिकांच्या एकात्मिक पॅक हाऊसला अपेडाचे मान्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील.

·                  एकूण प्रकल्प खर्चांपैकी कमीतकमी 60 टक्के म्हणजेच रू.30. 00 लाख मशिनरीसाठी तर उर्वरित 40 टक्के म्हणजेच रू. 20.00 लाख (जास्तीतजास्त) रक्कम बांधकामासाठी अनुज्ञेय राहील.

     अर्थसहाय्याचे स्वरुप :-

·         अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च               :- रु. 50.00 लाख

·         बांधकाम क्षेत्र                      :- 9 मी x 18 मी.

·         देय अनुदान           :-  सर्वसाधारण क्षेत्रासाठी ग्राहय प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु. 17.50 लाख डोंगराळ अधिसूचित क्षेत्रासाठी ग्राहय प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 25.00 लाख अर्थसहाय्य देय आहे. अर्थसहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राहय धरण्यात येतील.

      पात्र लाभार्थी-

·            शेतकरी, शेतकरी गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत.

·            वैयक्तीक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.

·            भागीदारी संस्था असल्यास भागीदारांपैकी एकाही भागीदाराची यापुर्वी अनुदानीत इतर काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाधारित एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शितकरण गृह, शितखोली , शितगृह, शितवाहन, रायपनिंग चेंबर एकात्मिक शितसाखळी प्रकल्पात भागीदारी असल्यास पुन:श्च सदर भागीदार संस्थेस लाभ घेता येणार नाही

·            सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), शासकीय संस्था, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील) यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही, मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखापरिक्षण केलेल्या मागील सलग 3 वर्षाचे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना प्रकल्प किंमतीतील स्वभांडवल उभारू शकतील याबबतचे पुरावे सादर करावे लागतील.

अर्ज कुठे करावा -

लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी हॉर्टनेट http://www.hortnet.gov.in/ MahaDBT या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी www.mahanhm.gov.in krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वरील मार्गदर्शक सूचना पहा किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

      पुर्व शितकरण गृह (Pre-cooling Unit)/ फिरते पुर्व शितकरण गृह ( Mobile Pre-cooling Unit) :-

फलोत्पादीत, औषधी सुगंधी वनस्पती मालाची काढणी झाल्यानंतर/प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर त्यातील उष्णता  (field heat)कमी करणे आणि आवश्यक्तेनुसार पुढिल कार्यवाही करणे तसेच फलोत्पादीत, औषधी सुगंधी वनस्पतीचा टिकाउपणा वाढविणे यासाठी पुर्व शीतकरण केन्द्राची आवश्यकता असते. . फिरते पुर्व शीतकरण केंद्र हे फिरते केंद्र असुन शेतकरी यांच्या शेतावर जाउन फलोत्पादीत, औषधी सुगंधी वनस्पती मालाचे पुर्व शीतकरण करणे अपेक्षीत आहे.

प्रकल्पाचे  तांत्रिक निकष :-

·      पुर्वशितकरण गृह हे एकात्मिक पॅक हाऊस, शितगृह , शितवाहन किंवा शितखोलीस जोडलेले असावे. केवळ स्वतंत्र पुर्वशितकरण गृह घटक अनुज्ञेय राहणार नाही.

·      किमान प्रकल्प क्षमता 6 मे.टन प्रतिदिवस प्रति युनिट असणे आवश्यक राहील.

·      शेतातुन निघालेल्या ताज्या फळपिकांची फिल्ड हिट 4 ते 6 तासात काढणे आवश्यक असल्याने त्या क्षमतेचे Evaporating & Condensing Unit बसविणे बंधनकारक राहील.

·      प्रत्येक चेंबरला Air Curtain / Strip Curtain बसविणे बंधनकारक राहील.

·      एकूण प्रकल्प खर्चांपैकी कमीतकमी 60 टक्के म्हणजेच रू. 15.00 लाख मशिनरीसाठी तर उर्वरित 40 टक्के म्हणजेच रू. 10.00 लाख (जास्तीतजास्त) रक्कम बांधकामासाठी अनुज्ञेय राहील.

·      फिरते पुर्व शितकरण गृह या घटकात वाहन आणि मशिनरीचा खर्च हा भांडवली खर्च म्हणून गृहीत धरण्यात येईल. मात्र वाहन हे याच उद्देशासाठी घेतलेले आहे याबाबत आर.टी.. (R.T.O.) कडे वाहनाची नोंद करणे आवश्यक आहे.

अर्थसहाय्याचे स्वरुप :-

·         अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च       :- रु. 25.00 लाख

·         देय अनुदान             :-  सर्वसाधारण क्षेत्रासाठी ग्राहय प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु. 8.75 लाख डोंगराळ अधिसूचित क्षेत्रासाठी ग्राहय प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 12.50 लाख अर्थसहाय्य देय आहे. अर्थसहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राहय धरण्यात येतील.

    पात्र लाभार्थी-

·            शेतकरी, शेतकरी गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत.

·            वैयक्तीक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.

·            भागीदारी संस्था असल्यास भागीदारांपैकी एकाही भागीदाराची यापुर्वी अनुदानीत इतर काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाधारित एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शितकरण गृह, शितखोली , शितगृह, शितवाहन, रायपनिंग चेंबर एकात्मिक शितसाखळी प्रकल्पात भागीदारी असल्यास पुन:श्च सदर भागीदार संस्थेस लाभ घेता येणार नाही

·            सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), शासकीय संस्था, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील) यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही, मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखापरिक्षण केलेल्या मागील सलग 3 वर्षाचे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना प्रकल्प किंमतीतील स्वभांडवल उभारू शकतील याबबतचे पुरावे सादर करावे लागतील.

 अर्ज कुठे करावा -

लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी हॉर्टनेट http://www.hortnet.gov.in/ MahaDBT या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी www.mahanhm.gov.in krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वरील मार्गदर्शक सूचना पहा किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

शितखोली (स्टेजिंग) Cold room (Staging)

प्रकल्पाचे  तांत्रिक निकष  :-          

  • कमाल प्रकल्प क्षमता 30 मे.टन प्रतिदिवस प्रति युनिट असणे आवश्यक राहील. शितखोलीची क्षमता 30 मे.टनापेक्षा कमी असल्यास यथाप्रमाणाआधारे (Prorata Basis) अनुदान अनुज्ञेय राहील. तथापि, किमान प्रकल्प क्षमता 5 मे.टन प्रति युनिट असणे आवश्यक राहील.
  • शितखोलीस Add on घटक म्हणून सौर /अक्षय ऊर्जा स्त्रोत वापरल्यास 100 टक्के Tax invoice प्रकल्प खर्चात ग्राह्य धरण्यात येईल. 

अर्थसहाय्याचे स्वरुप :-

·         अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च       :- रु. 15.00 लाख / प्रती युनिट

·         देय अनुदान             :-  सर्वसाधारण क्षेत्रासाठी ग्राहय प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु. 5.25 लाख डोंगराळ अधिसूचित क्षेत्रासाठी ग्राहय प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 7.50 लाख अर्थसहाय्य देय आहे. अर्थसहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राहय धरण्यात येतील.

पात्र लाभार्थी-

·            शेतकरी, शेतकरी गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत.

·            वैयक्तीक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.

·            भागीदारी संस्था असल्यास भागीदारांपैकी एकाही भागीदाराची यापुर्वी अनुदानीत इतर काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाधारित एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शितकरण गृह, शितखोली , शितगृह, शितवाहन, रायपनिंग चेंबर एकात्मिक शितसाखळी प्रकल्पात भागीदारी असल्यास पुन:श्च सदर भागीदार संस्थेस लाभ घेता येणार नाही

·            सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), शासकीय संस्था, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील) यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही, मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखापरिक्षण केलेल्या मागील सलग 3 वर्षाचे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना प्रकल्प किंमतीतील स्वभांडवल उभारू शकतील याबबतचे पुरावे सादर करावे लागतील.

अर्ज कुठे करावा -

लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी हॉर्टनेट http://www.hortnet.gov.in/ MahaDBT या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी www.mahanhm.gov.in krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वरील मार्गदर्शक सूचना पहा किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

शीतगृह (नविन) (cold storage)

फळे, फुले, भाजीपाला , औषधी सुगंधी वनस्पती यासारख्या नाशवंत मालाचा दर्जा कायम ठेउन आयुष्य वाढविणे, प्रक्रिया प्रकल्प धारकांना वर्ष भर कच्च्या मालाचा पुरवठा करणे यासाठी शीत गृह आवश्यक असते.

.क्र.

घटक

मापदंड

कमाल मर्यादा

अनुदान

सर्वसाधारण क्षेत्र

डोंगराळ अधिसूचित क्षेत्र

1

नविन शितगृह युनिट प्रकार- 1 (एकसारख्या तापमानात राहणाऱ्या उत्पादनासाठी)

(प्रती चेंबर >250 टन)

रु. 8000 प्रती मे. टन

5000 मे. टन प्रती लाभार्थी

35 टक्के जास्तीत जास्त रु 140.00 लाख

50 टक्के जास्तीत जास्त रु.200.00 लाख

2

शीतगृह युनिट प्रकार - 2 (एकापेक्षा अधिक उत्पादने   तापमानासाठी)

कमीत कमी 6 चेंबर्स पेक्षा जास्त (प्रती चेंबर <250 टन)

रु. 10,000 प्रती मे.टन

5000 मे. टन प्रती लाभार्थी

35 टक्के जास्तीत जास्त रु. 175.00 लाख

50 टक्के जास्तीत जास्त रु. 250.00 लाख

3

शीतगृह युनिट प्रकार - 2 (नियंत्रित वातावरणासाठी नविन तंत्रज्ञान राबविणे)

रु. 10000 प्रती मे.टन

5000 मे. टन प्रती लाभार्थी

35 टक्के जास्तीत जास्त रु. 175.00 लाख

50 टक्के जास्तीत जास्त रु. 250.00 लाख

प्रकल्पाचे तांत्रिक निकष :-

·         संपूर्ण शितगृहामध्ये / शितगृहातील विविध चेंबरमध्ये एकसारखे तापमान आणि आर्द्रता राखण्यासाठी Efficient Heat Transfer असणारा पृष्ठभाग आणि हवेचे पुरेसे अभिसरण होण्यासाठी आवश्यक अशा कॉइल्स आणि डिफ्युजर सिस्टम बसविणे आवश्यक आहे.

·         शितगृहामध्ये आवश्यकतेनुसार वेगवेगळे तापमान ठेवण्यासाठी योग्य असणारी Refrigeration System बसविणे आवश्यक असुन वापरण्यात येणारा Refrigerant हा इको-फ्रेंन्डली असावा. संपूर्ण Refrigeration System ची कार्यक्षमता पुरेपुर वापरण्यासाठी / वाढवीणेसाठी Monitoring and control mechanism यंत्रणेची व्यवस्था करण्यात यावी.

·         आवश्यक क्षमतेचे मल्टी सिलेंडर रेसीप्रोकेटींग किंवा स्क्रुटाईप कॉम्प्रेसर बसविण्यात यावेत.

·         प्रत्येक चेंबरला Air Curtain / Strip Curtain बसविणे बंधनकारक राहील.

·         शक्य तेवढा विज वापर कमी करण्यासाठी कंन्डेनसरची आखणी / ठेवण अशा प्रकारे करावी की, शितगृहासाठी विजेचा वापर माफक वेळेसाठीच व्हावा.

·         योग्य प्रकारच्या थर्मल इन्सुलेशनन चा वापर करावा ज्यामध्ये बाहेरच्या बाजुने व्हेपर बॅरीअर आणि आतील बाजुने क्लॉडींग / कव्हर मटेरीयलची सुविधा असावी. योग्य प्रकारच्या BIS Standard आणि Code जसे IS-661:2000, IS-661, IS-13205 चे साहित्य इन्सुलेशन साठी वापरावे.

·         एमआयडीएच आणि एनसीसीडीच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे शितगृहासाठी 3.4 क्युबीक मीटर चेंबर व्हॉल्युम 1 मे.टन क्षमतेस समतुल्य ग्राह्य धरण्यात येईल.

·         अनुभवी आणि शितगृहासंबंधातील योग्य शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्याची / अधिकाऱ्याची तसेच किमान एक कृषि / फलोत्पादन पदवीधारकाची नेमणुक शितगृह व्यवस्थीत चालविण्यासाठी करावी.

·         एनसीसीडी (NCCD) च्या स्टॅडर्ड नुसार काम होत आहे याबाबतची खात्री होणे आवश्यक आहे.

·         प्रत्येक चेंबरमधील तापमान, आर्द्रता पहाण्यासाठी स्वतंत्र Display Instrument असावे तसेच आवश्यकतेनुसार तापमान आणि आर्द्रता बदलण्यासाठी uकन्ट्रोल मॅकॅनिझमम असावे.

·         शितगृहामध्ये फलोत्पादित, औषधी सुगंधी वनस्पती मालाचे बॉक्सेस, क्रेट्स, बॅग्ज् ठेवण्यासाठी आवश्यक त्या साहित्याचे फ्लोरिंग, रॅकींग करावे. फ्लोरिंग, रॅकींग मध्ये फिरण्यासाठी / माल ठेवण्यासाठी-काढण्यासाठी आवश्यक ते अंतर ठेवावे.

·         शितगृहाशी संलग्न सुविधा जसे हताने अथवा मशीनद्वारे साफसफाई, निवड, प्रतवारी, पॅकींग, बॅगींग . साठी आवश्यक तेवढी जागा आणि सुविधा असणे आवश्यक आहे.

·         शितगृहास जनरेटर बॅक अप असणे बंधनकारक राहील.

·          शितगृहामध्ये साठवण केलेल्या मालास शेतमाल तारण योजने अंतर्गत लाभ देण्यासाठी योग्य ती कार्यवाही/सहकार्य करणे बंधनकारक राहील.

·           शितगृहामध्ये बंदी असलेले रेफ्रिजरेंट वापरण्यास मनाई राहील. असे बंदी असलेले रेफ्रिजरेंट वापरलेले आढळून आल्यास प्रकल्प रद्द करण्यात येईल.

·         मल्टी चेंबरर शितगृह ज्यामध्ये नविन/आधुनिक तंत्रज्ञानाचा जसे इन्सुलेशन, हयुमिडिटी कंन्ट्रोल, आधुनिक कुलींग सिस्टीम .चा केंद्रशासनाच्या कृषि विभागाने दिलेल्या तपशील आणि मानके (स्पेशिफिकेशन्स आणि स्टँन्डर्स) नुसार वापर करुन कमीत कमी उर्जा वापरली जाईल अशाच शितगृहांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मंजुरी देण्यात येईल.

·          शितगृह या घटकाकरिता बांधकाम खर्च 50 टक्के, इन्सुलेशन 12.50 टक्के, रेफ्रिजरेशन सिस्टीम 25 टक्के, इलेक्ट्रिकल सिस्टीम 12.50 टक्के प्रकल्प खर्च ग्राह्य धरण्यात येईल. बांधकाम खर्चामध्ये मेझॅनाईन ग्रेटिंग, आग प्रतिबंधक उपाययोजना, लिफ्ट रिसीवर डॉक या घटकांचा समावेश राहील तर इलेक्ट्रिकल सिस्टीम खर्चात ट्रान्साफार्मर, डी.जी. सेट . घटकांचा समावेश राहील.

·          काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत विविध प्रस्तावासाठी आवश्यक असणारी कुलिंग सिस्टम पॅनेल हे एनसीसीडी च्या मार्गदर्शक सुचनांनुसार असावेत.

·         परीपुर्ण मार्गदर्शक सुचना, तांत्रिक तपशील आणि या विषयाचे नियम (प्रोटोकॉल) - एनएचबी  एनसीसीडी ने तयार केलेले, यासाठी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची वेबसाईट www.mahanhm.gov.in तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, नवि दिल्ली यांची वेबसाईट www.nhm.nic.in पहावी.

   अर्थसहाय्याचे स्वरुप:-

·            नविन शितगृह युनिट प्रकार- 1 एकसारख्या तापमानात राहणाऱ्या उत्पादनासाठी प्रती चेंबर (250 मे. टन पेक्षा जास्त क्षमतेचे) 5000 मे.टन क्षमतेसाठी प्रति लाभार्थी सर्वसाधारण क्षेत्रासाठी ग्राहय भांडवली प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु.140.00 लाख आणि डोंगराळ अधिसूचित क्षेत्रासाठी ग्राहय भांडवली प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 200.00 लाख अर्थसहाय्य देय आहे.

·            शीतगृह युनिट प्रकार - 2 एकापेक्षा अधिक उत्पादने   तापमानासाठी कमीत कमी 6 चेंबर्स पेक्षा जास्त प्रती चेंबर (250 मे. टन पेक्षा कमी क्षमतेचे) 5000 मे.टन क्षमतेसाठी प्रति लाभार्थी सर्वसाधारण क्षेत्रासाठी ग्राहय भांडवली प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु. 175.00लाख आणि डोंगराळ अधिसूचित क्षेत्रासाठी ग्राहय भांडवली प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.250.00 लाख अर्थसहाय्य देय आहे.

·            शीतगृह युनिट प्रकार - 2 नियंत्रित वातावरणासाठी नविन तंत्रज्ञान राबविणे 5000 मे.टन क्षमतेसाठी प्रति लाभार्थी सर्वसाधारण क्षेत्रासाठी ग्राहय भांडवली प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु. 175.00लाख आणि डोंगराळ अधिसूचित क्षेत्रासाठी ग्राहय भांडवली प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 250.00 लाख अर्थसहाय्य देय आहे.

   पात्र लाभार्थी-

·                    शेतकरी, शेतकरी गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत.

·                    वैयक्तीक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.

·                    भागीदारी संस्था असल्यास भागीदारांपैकी एकाही भागीदाराची यापुर्वी अनुदानीत इतर काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाधारित एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शितकरण गृह, शितखोली , शितगृह, शितवाहन, रायपनिंग चेंबर एकात्मिक शितसाखळी प्रकल्पात भागीदारी असल्यास पुन:श्च सदर भागीदार संस्थेस लाभ घेता येणार नाही

·                    सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), शासकीय संस्था, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील) यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही, मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखापरिक्षण केलेल्या मागील सलग 3 वर्षाचे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना प्रकल्प किंमतीतील स्वभांडवल उभारू शकतील याबबतचे पुरावे सादर करावे लागतील.

     अर्ज कुठे करावा -

लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी हॉर्टनेट http://www.hortnet.gov.in/ MahaDBT या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी www.mahanhm.gov.in krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वरील मार्गदर्शक सूचना पहा किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा 

शितवाहन (Refrigerated Transport Vehicles)

उद्देश-

वाहतुकी दरम्यान फळे, फुले, भाजीपाला, औषधी सुगंधी वनस्पती यासारख्या नाश वंत मालाचे दर्जा टिकवुन ठेउन आयुष्य वाढविणे होणारे नुकसान टाळणे.

 प्रकल्पाचे तांत्रिक निकष :-

·    शितवाहनाची कमाल क्षमता 9 मे.टन असावी 4 मे.टन पेक्षा कमी क्षमता असलेल्या शितवाहनास अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.

·    एमआयडीएच आणि एनसीसीडीच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे शितवाहनासाठी 3 क्युबीक मीटर चेंबर व्हॉल्युम 1 मे.टन क्षमतेस समतुल्य ग्राह्य धरण्यात येईल

·    लाभार्थीने सदर वाहनाची नोंद R.T.O. कडे गुड्स कॅरीअरम्हणून करणे बंधनकारक आहे. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक फलोत्पादीत, औषधी सुगंधी वनस्पती पिकांची बॅकवर्ड फॉरवर्ड
 लिंकेजेस असणे आवश्यक आहे.

अर्थसहाय्याचे स्वरुप :-

  वाहन खरेदी तसेच वाहनावर उपलब्ध करुन घ्यावयाच्या रेफ्रिजरेशन इतर अनुषंगिक सुविधांसाठी अनुदान देय राहिल.

·         अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च        :- रु. 26.00 लाख

·         देय अनुदान                 :- सर्वसाधारण क्षेत्रासाठी ग्राहय प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा कमाल रु. 9.10 लाख डोंगराळ अधिसूचित क्षेत्रासाठी ग्राहय प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु. 13.00 लाख अर्थसहाय्य देय आहे. अर्थसहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राहय धरण्यात येतील.

   पात्र लाभार्थी-

·                    शेतकरी, शेतकरी गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत.

·                    वैयक्तीक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.

·                    भागीदारी संस्था असल्यास भागीदारांपैकी एकाही भागीदाराची यापुर्वी अनुदानीत इतर काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाधारित एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शितकरण गृह, शितखोली , शितगृह, शितवाहन, रायपनिंग चेंबर एकात्मिक शितसाखळी प्रकल्पात भागीदारी असल्यास पुन:श्च सदर भागीदार संस्थेस लाभ घेता येणार नाही

·                    सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), शासकीय संस्था, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील) यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही, मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखापरिक्षण केलेल्या मागील सलग 3 वर्षाचे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना प्रकल्प किंमतीतील स्वभांडवल उभारू शकतील याबबतचे पुरावे सादर करावे लागतील.

 अर्ज कुठे करावा -

लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी हॉर्टनेट http://www.hortnet.gov.in/ MahaDBT या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी www.mahanhm.gov.in krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वरील मार्गदर्शक सूचना पहा किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

रायपनिंग चेंबर (Ripening chamber)

   उद्देश-

1.    इथिलीन सारख्या नैसर्गिक सम्प्रेरकाचा (natural hormone) वापर करुन केळी, आंबा, पपई .

2.    फळपीकांना गरजे नुसार पिकवता येते.

3.    फळांतील रस, गरर साल .एक संघ पिकत असल्यामूळे फळांचा टिकाऊ पणा वाढतो.

4.    फळांच्या वजना मध्ये कमीत कमी घट आणि फळांची गोडी, चव आकर्षक पणा वाढतो.

प्रकल्पाचे तांत्रिक निकष :-

·         रायपनिंग चेंबरची प्रति युनिट कमाल प्रकल्प क्षमता 300 मे. टन

·         एनसीसीडी (NCCD) च्या स्टॅडर्ड नुसार काम करणे बंधनकारक राहील.

·         एमआयडीएच आणि एनसीसीडीच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे रायपनिंग चेंबरसाठी 10 मे.टन किंवा जास्त क्षमतेच्या चेंबरकरीता 11 क्युबीक मीटर चेंबर व्हॉल्युम 1 मे.टन क्षमतेस समतुल्य ग्राह्य धरण्यात येईल. मात्र 10 मे.टन क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या चेंबरकरीता 12 क्युबीक मीटर चेंबर व्हॉल्युम 1 मे.टन क्षमतेस समतुल्य ग्राह्य धरण्यात येईल.

·         50 क्युबीक मीटर चेंबर व्हॉल्युम पेक्षा कमी क्षमतेचे रायपनिंग चेंबर ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

अर्थसहाय्याचे स्वरुप :-

·         अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च      :- रु. 1.00 लाख प्रती मे. टन

·         देय अनुदान                      :- ग्राहय भांडवली खर्चाच्या

               ) सर्वसाधारण क्षेत्र - 35 टक्के 

                           ) डोंगराळ अधिसूचित क्षेत्र - 50 टक्के

पात्र लाभार्थी-

·                    शेतकरी, शेतकरी गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत.

·                    वैयक्तीक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.

·                    भागीदारी संस्था असल्यास भागीदारांपैकी एकाही भागीदाराची यापुर्वी अनुदानीत इतर काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाधारित एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शितकरण गृह, शितखोली , शितगृह, शितवाहन, रायपनिंग चेंबर एकात्मिक शितसाखळी प्रकल्पात भागीदारी असल्यास पुन:श्च सदर भागीदार संस्थेस लाभ घेता येणार नाही

·                    सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), शासकीय संस्था, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील) यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही, मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखापरिक्षण केलेल्या मागील सलग 3 वर्षाचे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना प्रकल्प किंमतीतील स्वभांडवल उभारू शकतील याबबतचे पुरावे सादर करावे लागतील.

अर्ज कुठे करावा -

लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी हॉर्टनेट http://www.hortnet.gov.in/ MahaDBT या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी www.mahanhm.gov.in krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वरील मार्गदर्शक सूचना पहा किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

प्राथमिक प्रक्रिया केंद्र (Primary Processing Unit)

प्राथमिक प्रक्रियेमध्ये काजू प्रक्रिया केंद्र, वाळवणे, पल्प काढणे,भूकटी करणे .तसेच बेदाना तयार करणे, नैसर्गिक रंग, सुगंधी तेल . सुका भाजीपाला फळे, ताजी कापलेली फळे भाजीपाला, औषधी सुगंधी वनस्पती यांचे पैकिंग,पल्पींग कैनींग, हळद प्रक्रिया हळद कूकर .घटकांचा विचार होवू शकतो.

उद्देश-

1.फळे, फुले, भाजीपाला, औषधी सुगंधी वनस्पती यासारख्या नाश वंत मालाचे दर्जा आयुष्य वाढविने.

2. कच्चा माल प्रक्रिया करुन गुणात्मक वाढ/ मुल्य वर्धन करण्यासाठी चालना देणे.

प्रकल्पाचे तांत्रिक निकष :-

·         प्रकल्पाचा मशिनरी हा महत्त्वाचा भाग असल्याने त्यावर कमीतकमी 60 टक्के खर्च करणे बंधनकारक राहील प्रकल्पाचे बांधकाम हे गरजेपुरतेच असल्याने त्यावर जास्तीतजास्त 40 टक्के खर्च गृहित धरण्यात यावा. बांधकाम खर्चामध्ये प्रकल्पाच्या इमारत बांधकाम, विद्युत सुविधा उभारणी, वाळवणी आवार, साठवण गृह . सर्व घटकांचा समावेश राहील.

·       काजु प्रक्रिया केंद्राच्या मापदंड मंडळ कार्यालयाने निर्धारित केल्याप्रमाणे उभारणी करणे बंधनकारक राहील.

अर्थसहाय्याचे स्वरुप :-

·         अधिकतम ग्राह्य प्रकल्प खर्च      :- रू. 25.00 लाख

·          देय अनुदान  :-  सर्वसाधारण क्षेत्रासाठी ग्राहय प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 10.00 लाख डोंगराळ अधिसूचित क्षेत्रासाठी ग्राहय प्रकल्प खर्चाच्या 55 टक्के किंवा कमाल रु. 13.75 लाख अर्थसहाय्य देय आहे. अर्थसहाय्यासाठी भांडवली खर्चाच्या बाबी ग्राहय धरण्यात येतील.

पात्र लाभार्थी-

·                    शेतकरी, शेतकरी गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत.

·                    वैयक्तीक शेतकरी, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता गट (ज्यामध्ये किमान 15 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनी, शेतकरी गट यांचेसाठी अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून (Credit Linked Back Ended Subsidy) बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरुपात अनुदान देय राहील.

·                    भागीदारी संस्था असल्यास भागीदारांपैकी एकाही भागीदाराची यापुर्वी अनुदानीत इतर काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्पाधारित एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शितकरण गृह, शितखोली , शितगृह, शितवाहन, रायपनिंग चेंबर एकात्मिक शितसाखळी प्रकल्पात भागीदारी असल्यास पुन:श्च सदर भागीदार संस्थेस लाभ घेता येणार नाही

·                    सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs), शासकीय संस्था, राज्य सहकारी संस्था, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये कमीतकमी 25 सदस्य असतील) यांना अनुदान वगळता प्रकल्पाचा इतर खर्च स्वत: उभारणार असल्यास त्यांना बँक कर्जाची अट असणार नाही, मात्र त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम असल्याचे लेखापरिक्षण केलेल्या मागील सलग 3 वर्षाचे अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना प्रकल्प किंमतीतील स्वभांडवल उभारू शकतील याबबतचे पुरावे सादर करावे लागतील.

अर्ज कुठे करावा -

लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी हॉर्टनेट http://www.hortnet.gov.in/ MahaDBT या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी www.mahanhm.gov.in krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वरील मार्गदर्शक सूचना पहा किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

1 comment:

  1. मला शेत तळ्यात मासे पालना बद्दल माहिती हवी आहे मासे पालना बाबत शासकीय योजना सुरू असल्यास माहिती द्यावी ही विनंती आहे
    तसेच शेत तळल्यावर सौरऊर्जा प्रकल्प बसवायचा आहे त्या बाबतची माहिती द्यावी

    ReplyDelete