कांदाचाळ
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत कांदाचाळ
सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्तानिकरीत्या तयार
केलेल्या चाळीमध्ये कांदयाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच
कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुद्द कांदाचाळ
उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता
राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.
१. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन
संकेतस्थळावर नोंदणी करावी.
२. अर्थसहाय्यचे स्वरूप -
५, १०, १५, २० व २५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के
किंवा कमाल रुपये ३५००/- प्रति मे. टन
याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहील. एका लाभार्थ्याला २५ मे टन
क्षमतेच्या कमाल मर्यादा पर्यंतच अनुदान देय राहील.
३. लाभार्थी निवडीचे निकष
-
अ . शेतकऱ्याने योजने
अंतर्गत अर्ज करतांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. ७/१२ वर
कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
ब . शेतकऱ्याकडे कांदा
पीक असणे बंधनकारक आहे.
क . सादर योजनेचा लाभ
वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट,
स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत
शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या
सहकारी संस्था, सहकारी पणन संघ
यांना घेता येईल.
४. ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
अ . ७/१२
ब. ८ अ
क. आधार कार्डाची छायांकित प्रत
ड. आधार संलग्न बँक
खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
इ. जातीचा प्रमाणपत्र
(अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
ई. यापूर्वी कोणत्याही
योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र.
५ . शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी
केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय
येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर काम कांदाचाळ
उभारणीचे काम सुरु करावे. पूर्वसंमती दिल्यापासून
दोन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारणे आवश्यक आहे .
“कृषी योजनांचा अधिक माहिती साठी”
खालील कृषी विभागाची Whats App चॅनल, युट्युब चॅनल, टेलिग्राम चॅनल, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, ट्विटर खाते, like and Follow or Subscribe करा.
कृषी विभाग वेबसाईट : https://krishi.maharashtra.gov.in
कृषी विभाग युट्युब चॅनल : https://youtube.com/@AgricultureDepartmentGoM
कृषी विभाग Whats App चॅनल: https://whatsapp.com/channel/0029Va9TaWN8fewi8s27o53T
कृषी विभाग टेलिग्राम चॅनल: https://t.me/AgricultureDepartmentGoM
कृषी विभाग इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/agricutlure_gom/
कृषी विभाग फेसबुक पेज : https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM
कृषी विभाग ट्विटर खाते : https://twitter.com/AgriDeptGoM
Ok
ReplyDeleteOk
ReplyDeleteKk.
ReplyDeleteDear Sir / Madam,
ReplyDeleteThanks for this platform for farmers.
I have many daoubt about this system.
I applied for Onion storage on my mothers name in last 3 years.
Yet i didnot receive any single money.
I donot have proper guidance also.
I am struggling myself and someone who needed this scheme on urgent basis.
Some politicians doing there work very well and getting this scheme benefts.
I am escallating this issue via this plaftform.
If i am not satisfy then i will again escallate this issue upto higher minsitry also.
Please do needful.
Best Regards,
Nilesh Kale.
+919890594777.
महाराष्ट्रात कांदा चाळ अनुदान योजना ही अगोदर Hortnet शासनाच्या पोर्टलवर होती. परंतु शासनाने आता मोठा बदल करून शेतीसंबंधीत सर्व योजना तसेच स्कॉलरशिप या योजना महाडीबीटी पोर्टलवर सुरू केल्या आहेत. तर शेतकऱ्यांना एकाच अर्जावर सर्व योजनांचे फॉर्म भरता येतात. शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केला आहे, तर यासंबंधीतील अधिक माहिती तसेच कांदा चाळ साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा आणि त्यासंबंधीतील व्हिडिओ माहिती हवी असल्यास खालील दिलेल्या माहितीवर भेट द्या. Shetkari Yojana, Mahadbt Scheme
ReplyDelete