भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना


भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

 

अनुदान मर्यादा :- १०० टक्के राज्य योजना

 

कार्यान्वीत यंत्रणा :- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सर्व

 

योजनेचा उद्देश :-

 

  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.

 

पीक रचनेत बदल घडवून आणणे.

 

प्रक्रीया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादनात वाढ करणे.

 

स्वरुप / घटक :-

 

लाभार्थीस १०० टक्के अनुदान देय आहे.

 

योजनेचा लाभ कोकण विभागासाठी कमाल १०.० हेक्टर तर उर्वरीत महाराष्ट्रासाठी कमाल ६.० हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुज्ञेय आहे.

 

कोकण विभाग वगळता ठिबक सिंचन संच बसविणे बंधनकारक आहे.

 

योजने अंतर्गत आंबा, काजु, पेरु, चिक्कू, डाळींब, सिताफळ, कागदी लिंबू, नारळ, चिंच, अंजिर, आवळा, कोकम, फणस, जांभूळ, संत्रा, मोसंबी या १६ बहूवार्षिक फळपीकांची आवश्यकतेनुसार कलमे / रोपांद्वारे लागवड करण्यास मान्यता

 

आंबा व पेरू या फळपिकांच्या घन लागवडीस मान्यता.

 

संत्रा पिकाच्या इंडो इस्त्राईल पद्धतीने लागवडीस मान्यता.

 लाभार्थी पात्रता निकष

 वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.

 शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे ७/१२ असणे आवश्यक आहे.

 

जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्तखातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक आहे.

 

जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक आहे.

 

परंपरागत वननिवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम, २००६ नुसार वनपट्टेधारक शेतकरी योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.

अर्जदारांची नोंदणी व आधार प्रमाणीकरण:-

 

सर्व इच्छुक शेतकऱ्यांना महा डीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे तथापी, सदर प्रक्रिया शेतकऱ्यांना एकदाच करावी लागणार आहे. पोर्टलवर अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती User manual द्वारे दिलेली आहे.

 

संकेतस्थळ:- महाडीबीटी पोर्टलचे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिक सिंचन या बाबी करीता https://mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळावर वेगवेगळे अर्ज करावेत संकेतस्थळावरील "शेतकरी योजना" हा पर्याय निवडावा.

 

अर्ज शुल्क:- अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांनी रु. २०/- शुल्क व रु. ३.६०/- जी.एस.टी. मिळून एकूण रु.२३.६०/- शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे.

 

15 comments:

  1. अर्ज कधी सुटणार आहे.

    ReplyDelete
  2. अर्ज कधी सुटणार आहे

    ReplyDelete
  3. अर्ज कधी भरा लागते, संत्रा लागवडीसाठी

    ReplyDelete
  4. अर्ज भरण्याची तारीख कळवा

    ReplyDelete
  5. अर्ज भरण्याची तारीख कळवा

    ReplyDelete
  6. अर्ज कधी भरावा लागेल

    ReplyDelete
  7. अर्ज कुठे व केव्हा भरावा लागेल पेरू साठी

    ReplyDelete
  8. अर्ज कुठे व केव्हा भरावा लागेल पेरू साठी

    ReplyDelete
    Replies
    1. डाळिंब पिकासाठी अर्ज कधी भरावा

      Delete
  9. Chandrapur district sathi santra ya yojnet ahe ka..

    ReplyDelete
  10. पेरू पिका साठी अर्ज करावा लागतो तर कुठे करावा लागेल

    ReplyDelete
  11. पेरू पिका साठी अर्ज करावा लागतो तर कुठे व कोणत्या वेबसाईटवर करावा लागेल?

    ReplyDelete
  12. राधानगरी क्रषी कार्यालया फोन नंबर द्या

    ReplyDelete